या प्राचीन मंदिरात आहे भगवान बुद्धांचा दात

भगवान गौतम बुद्धांचा मृत्यू ईसवी पुर्व 483 मध्ये झाला होता. या गोष्टीला हजारो वर्ष होऊन गेली आहेत. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, श्रीलंकेत एक असे मंदिर आहे, जेथे आजही भगवान बुद्धांचा दात ठेवला असल्याचा दावा केला जातो. हे मंदिर श्रीलंकेच्या कँडी शहरात असून, हा दात आजही वाढत असल्याचा दावा केला जातो.

कँडी शहर एकेकाळी श्रीलंकेची राजधानी होते. या मंदिराला ‘दात मंदिर’ म्हणून देखील ओळखले जाते. कँडीत अनेक धार्मिक मंदिर असल्याने, या जागेचे धार्मिक महत्त्व देखील आहे.

Image Credited – Amarujala

सांगण्यात येते की, भगवान बुद्ध यांनी देह त्यागल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कार उत्तरप्रदेशच्या कुशीनगर येथे झाले होते. मात्र त्यांच्या एका अनुयायीने चितेवरून त्यांचा दात काढला व तो राजा ब्रह्मदत्त यांना दिला. अनेकवर्ष हा दात राजाकडेच होता.

भगवान बुद्धांच्या दातासाठी अनेक लढाया झाल्या. हा दात अनेक राजांकडे गेला. मात्र अखेर एका अनुयायीने लपवून हा दात श्रीलंकेत पोहचवला. प्राचीन काळात कँडीच्या एका राजाने आपल्या महालाजवळ या दातासाठी एक विशाल मंदिर बनवले. तेव्हापासून हा दात याच मंदिरात आहे.

Image Credited – Amarujala

वर्ष 1603 मध्ये पोर्तुगीजांनी श्रीलंकेवर हल्ला केल्यानंतर या दाताला सुरक्षेसाठी दुम्बारा येथे आणण्यात आले. मात्र नंतर पुन्हा दात कँडी येथे आणण्यात आला. या दात लहानशा डब्बीमध्ये ठेवण्यात आला आहे. मंदिरात जाणारे भाविक त्या दाताचे दर्शन करू शकतात.

Image Credited – Amarujala

दर बुधवारी या पवित्र दाताला सुगंधित फुल मानुमुरा मंगलयापासून बनलेल्या सुगंधित पाण्यापासून प्रतिकात्मक स्नान घातले जाते. त्यानंतर या पवित्र पाण्याला भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात येते.

Image Credited – Amarujala

कँडी शहरात दरवर्षी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कँडी पेराहेरा नावाने एक उत्सव साजरा केला जातो. यावेळी दात ठेवलेल्या डब्बीला संपुर्ण शहरात फिरवले जाते. या मंदिराला 1998 मध्ये यूनेस्कोने जागतिक वारसा म्हणून घोषित केले आहे.

Leave a Comment