भिकेचे डोहाळे लागलेल्या पाकिस्तानी संसदेत सुरू होणार ब्युटी पार्लर


कराची : आपल्या शेजारील राष्ट्र असलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला गेल्यामुळे पाकिस्तानला सध्या भिकेचे डोहाळे लागले आहेत. पाकिस्तानातील काही लोक एका वेळेच्या अन्नासाठी तळमळत आहेत पण याचे काही गांभीर्य देशाचे पंतप्रधान आणि खासदारांना नाही. पाकिस्तानच्या संसद संकुलासाठी अशी घोषणा करण्यात आली आहे, जी कदाचित पाकिस्तानच्या नागरिकांनाही चकित करेल.

महिला खासदारांसाठी पाकिस्तानच्या संसद परिसरात ब्युटी पार्लर खुले करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इस्लामाबादच्या सर्वोच्च नागरी एजन्सीला संसदीय गृहनिर्माण संकुलात ब्युटी पार्लर सुरू करण्यास सिनेटच्या समितीने सांगितले आहे. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्ताचा संदर्भ देताना आयएनएसने ही माहिती दिली. महिला खासदारांच्या उपस्थित हा निर्णय घेण्यात आला. सिनेट गृहनिर्माण समितीची संसद भवन संकुलात बैठक झाली आणि या बैठकीत महिला खासदारांसाठी ब्युटी पार्लर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर महिला खासदारांच्या सूचना असूनही संसद भवनामध्ये ब्युटी पार्लर का उघडले नाही यासाठी समितीने भांडवल विकास प्राधिकरणास (CAD) फटकारले आहे. सीडीएचे अध्यक्ष सलीम मंडीवाला यांनी हे आदेश देणाऱ्या समितीला सीडीएकडून या विषयावर ज्यांची नावे देण्यात आली आहेत अशा दोन महिला खासदारांशी चर्चा करून या विषयावर प्राधान्याने तोडगा काढण्याचे निर्देश दिले आहेत.

पाकिस्तानमध्ये एकीकडे महागाई शिगेला पोहचली आहे तर अर्थव्यवस्थेची स्थिती अत्यंत बिकट आहे. 2007-08च्या सुरुवातीच्या काळात पाकिस्तानमध्ये महागाईचा 17 टक्क्यांवर पोहोचला होता. पाकिस्तानात महागाईने जानेवारीत गेल्या 12 वर्षांचा विक्रम मोडला, जेव्हा त्याचा दर वाढून 14.6 टक्के झाला. ही वस्तुस्थिती खुद्द पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मान्य केली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत इमरान यांना ब्यूटी पार्लर सुरू करण्याचा विचार येतोच कसा, असा सवाल पाक नागरिक विचारत आहे.

Leave a Comment