जगातील सर्वात श्रींमत घोड्यांच्या शर्यतीत भाग घेणारी ही पहिली महिला

सौदी अरेबियामध्ये 29 फेब्रुवारीला जगातील सर्वात श्रींमत घोड्यांची शर्यत पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी पारितोषिक तब्बल 2 कोटी डॉलरचे (जवळपास 143 कोटी रुपये) ठेवण्यात आलेली आहे.

या शर्यत जिंकणाऱ्याला 72 कोटी रुपये रोख पुरस्कार म्हणून मिळणार आहेत. तर रनरअपला 25 कोटी रुपये मिळतील. एवढेच नाहीतर या शर्यतीत 10व्या स्थानावर येणाऱ्याला देखील मोठी रक्कम मिळणार आहे.

या शर्यतीची खास गोष्ट म्हणजे यात 7 आंतरराष्ट्रीय महिला जॉकी (घोडेस्वार) पैकी एक असलेली निकोला क्यूरी सौदी अरेबियाच्या या स्पर्धेत भाग घेणारी पहिली महिला रेसर आहे.

Image Credited – Bhaskar

द सौदी कप शर्यतीला बघण्यासाठी 10 हजारांपेक्षा अधिक लोक येतील अशी आशा आहे. 1800 मीटरची मुख्य शर्यत अब्दुल अजीज रेस ट्रॅकवर पार पडेल.

सौदीच्या जॉकी क्लबमध्ये रणनिती आणि आंतरराष्ट्रीय रेसिंगचे संचालक टॉम रयान म्हणाले की, हा खेळ सौदी अरेबियामध्ये खेळांना प्रोत्साहन देईल. सोबतच आंतरराष्ट्रीय घोड्यांसाठी व्यवसाय आणि जागतिक शर्यतीसाठी आमची ओळख बनविण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल असेल.

 

Leave a Comment