कॅनडा सरकार हॅरी आणि मेगनच्या सुरक्षेवरील खर्च करणार बंद

प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेगन मार्केल यांनी काही दिवसांपुर्वीच ब्रिटिश राजघराण्याच्या वरिष्ठ सदस्य पदाचा त्याग केल्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून हे दांपत्य वेस्टेर्नमोस्ट ब्रिटिश कोलंबिया (कॅनडाचा भाग) येथील समुद्र किनाऱ्या लगतच्या हवेलीत राहत आहेत. मात्र आता कॅनडाच्या सरकारने या शाही दांपत्याच्या सुरक्षेवर केला जाणारा खर्च सरकारद्वारे उचलला जाणार नसल्याचे जाहीर केले आहे.

कॅनडाच्या सार्वजनिक सुरक्षा मंत्रालयाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यक्ती अधिवेशनांतर्गत रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांमार्फत या जोडप्याला सुरक्षा प्रदान करण्यात येत होती.

कॅनडियन नागरिकांनी या शाही जोडप्याचे स्वागत केले होते. काही स्थानिक राजघराणे देखील याबाबत उत्सुक होती. या जोडप्यामुळे पर्यटनाला फायदा होईल असेही काहींना वाटत होते.

मात्र काही दिवसांपुर्वी घेतलेल पोलनुसार 77 टक्के कॅनेडियन करदाते या जोडप्याच्या सुरक्षेसाठी सरकारने खर्च केल्याने नाखूष आहेत.

Leave a Comment