स्टेडियम आणि स्टॅच्यूनंतर आता गुजरातमध्ये सगळ्यात मोठे मंदिर

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मोटेरा आणि जगातील सर्वात उंच प्रतिमा स्टॅच्यू ऑफ यूनिटीनंतर आता गुजरातमध्ये जगातील सर्वात उंच मंदिर उभारले जाणार आहे. यासोबतच गुजराच्या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद होणार आहे.

जवळपास 40 एकरमध्ये हे मंदिर उभारण्यात येणार असून, या मंदिराची उंची 431 फूट (131 मीटर) असणार आहे. हे मंदिर वैष्णोदेवी-जासपूर जवळ पाटीदारांचे कुलदैवत मां उमियाचे असेल. मंदिराच्या पायाभरणी समारंभाला जवळपास 2 लाख भाविक उपस्थित राहतील. या मंदिराला उभारण्यासाठी 1 हजार कोटी रुपये खर्च येणार आहेत.

या मंदिराचे डिझाईन जर्मन आणि भारतीय आर्किटेक्टने तयार केले आहे. मंदिरातील आतील भाग व्ह्यू गॅलेरीमध्ये अहमदाबाद शहर पाहता येईल. ही व्ह्यू गॅलेरी जवळपास 82 मीटर उंच असेल. मंदिराचे गर्भगृह भारतीय संस्कृतिनुसार तयार करण्यात येईल व तेथे मां उमियाच्या 52 फूट उंच मुर्तीची स्थापना केली जाईल. सोबतच मंदिरात शिवलिंग देखील स्थापित केले जाईल.

दरम्यान, काही दिवसांपुर्वीच अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम मोटेराचे उद्घाटन करण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड यांनी देखील या स्टेडियममध्ये नागरिकांना संबोधित केले.

याशिवाय जगातील सर्वात उंच प्रतिमा स्टॅच्यू ऑफ यूनिटी देखील गुजरातमध्ये आहे. ही प्रतिमा 182 मीटर उंच आहे. त्यामुळे आता स्टेडियम आणि स्टॅच्यूनंतर जगातील सर्वात उंच मंदिर देखील गुजरातमध्ये उभारल्याने एक नवा विक्रम होणार आहे.

Leave a Comment