हजारो माचिसच्या काड्या वापरून बनवली 400 वर्ष जुन्या जहाजेची प्रतिकृती

ब्रिटनच्या 61 वर्षीय माजी नाविक डेव्हिड रेनॉल्ड यांनी 400 वर्ष जुन्या मेफ्लोवर जहाजेची प्रतिकृती तयार केली आहे. मागील दोन वर्षांपासून ते जहाजेची मॉडेल तयार करण्यासाठी प्रयत्न करत होते. हे मॉडेल 4 फूट उंच आणि 5 फूट लांब आहे.

हे जहाज बनविण्यासाठी त्यांना 900 तास लागले. विशेष म्हणजे जहाजेची ही प्रतिकृती तब्बल 70 हजार माचिसच्या काड्यांपासून बनविण्यात आले आहे. या काड्यांना एकसोबत जोडण्यासाठी धागा, गमसोबत दोरीचा वापर करण्यात आला आहे. या जहाजेचे वजन जवळपास 7.2 किलो आहे.

Image credited – Bhaskar

या ऐतिहासिक जहाजेची प्रतिकृती बनविण्याआधी डेव्हिड यांनी त्याबाबत सर्व माहित जमा केली होती. मेफ्लोवर जहाज 6 सप्टेंबर 1620 ला 102 जणांना घेऊन रवाना झाले होते. दोन महिन्यानंतर ते मॅसाच्युसेटेस तटावर पोहचले होते. या जहाजेमध्ये एक मिनी बोट, डेक आणि तोफ होती. डेव्हिड यांनी या गोष्टी देखील जहाजेमध्ये तयार केल्या आहेत.

डेव्हिड यांनी याआधी 40 जहाजांचे मॉडेल तयार केलेले आहेत. वर्ष 2009 मध्ये 21 फूट उंच नॉर्थ सी ऑइल शीपची प्रतिकृती बनविण्यासाठी त्यांचे नाव गिनीज वर्डे रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले होते. यासाठी त्यांनी 41 लाख माचिसच्या काड्यांचा वापर केला होता.

Leave a Comment