पाक टोळधाडीचा सामना करणार चीनी बदक सेना


फोटो सौजन्य बिझिनेस टुडे
टोळधाडीच्या संकटात सापडलेल्या पाकिस्तानच्या मदतीसाठी मित्र चीनने त्याची खास प्रशिक्षित बदक सेना पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या टोळांचा समाचार १ लाख चीनी बदक सैनिक घेणार आहेत. निन्गो सायंदैनिकाने या संबंधी बातमी दिली आहे. त्यानुसार चीनच्या पूर्व प्रांत झेजीआंग मधून टोळ फस्त करणारी बदके पाक मध्ये पाठविली जात आहेत.

ही बदक सेना टोळधाडीचा सामना करण्यास तत्पर आहे कारण एक बदक एका दिवसात किमान २०० टोळ फस्त करते. या हिशोबाने १ लाख बदके कोट्यवधी टोळांचा फडशा पाडू शकणार आहेत. दोन दशकांपूर्वी चीनच्या उत्तर भागात अशीच टोळधाड आली होती तेव्हा बदकांच्या मदतीने त्यावर नियंत्रण मिळविले गेले होते. शेती तंत्र तज्ञ लु लिसि यांच्या म्हणण्याप्रमाणे बदकांचा वापर विषारी कीटकनाशकांच्या तुलनेत स्वस्त पडतो. त्यामुळे शेताला नुकसान होत नाही. कोंबड्यांच्या तुलनेत बदके तिप्पट टोळ खातात.


काही दिवसापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टोळधाडीचा कहर माजल्यावर राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात या टोळधाडीने पिकांचा फज्जा केला असून येथील पिक पूर्ण नष्ट झाले आहे. पाकचा बलुचिस्तान व यमन हे टोळांचे जन्मस्थान आहे. थंडी मध्ये टोळांचे प्रजनन होते आणि हवेची आणि वाऱ्याची दिशा बदलली की ही टोळधड पाकिस्तानमधून भारतात प्रवेश करते. गुजराथ, राजस्थान राज्यात त्याचा उपद्रव वाढतो. विशेषत पावसाळ्यात हा उपद्रव अधिक असतो.

Leave a Comment