पाकिस्तानात विंगकमांडर अभिनंदन यांचा चहा कप पुन्हा व्हायरल


फोटो सौजन्य सीबीसी को
भारतीय हवाई दलाचे फायटर पायलट विंग कमांडर अभिनंदन यांचा विसर १ वर्ष उलटल्यावरही पाकिस्तानला पडलेला नाहीच पण ज्या कपमधून अभिनंदन याना चहा पाजला गेला तो कप सुद्धा पाकिस्तानी लष्कराने अजून सांभाळून ठेवलेला आहे असे समजते. कारण त्या संदर्भातला एक व्हिडीओ पाकमध्ये सध्या व्हायरल होत आहे.

बालाकोट मध्ये भारतीय हवाई दलाने केलेला एअरस्ट्राईक आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच म्हणजे २७ फेब्रुवारी २०१९ ला पाक लढाऊ विमानांनी भारतीय हद्दीत केलेले आक्रमण, पाकिस्तानच्या एफ १६ लढाऊ विमानाचा मिग २१ मधून पाठलाग करून हे विमान पडणारे हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांच्या आठवणीना या घटनेच्या वर्षपूर्तीनिमित्ताने उजाळा मिळाला आहे आणि त्याचवेळी पाकिस्तानात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर पहिला जात आहे. पत्रकार नायला इनायत यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

या व्हिडीओ मध्ये टीव्ही अँकर हमीद मीर त्यादिवशी अभिनंदन यांना पाकिस्तानी हद्दीत पाक लष्कराने पकडल्यावर त्यांना ज्या अली अन्वर यांनी चहा दिला त्याची मुलाखत घेताना दिसत आहेत. त्यावेळी अली अभिनंदन ज्या कपातून चहा प्यायले तो कप ट्रे मध्ये धरून उभे राहिलेले दिसत आहेत आणि अभिनंदन यांनी चहा प्यायल्यावर चहा आवडल्याचे सांगितले असे सांगत आहे. एफ १६ विमानाचा पाठलाग करून ते पाडताना अभिनंदन यांचे विमान पाक हद्दीत क्रॅश झाले होते. तेव्हा त्यांना लष्कराने ताब्यात घेतल्यावरही त्यांना पाहुणचार म्हणून चहा पाजला गेला असा व्हिडीओ जगभर प्रसारित करण्याचा प्रयत्न पाकने केला होता.

अर्थात पाकिस्तानी आयएसआय आणि लष्कर यांनी अभिनंदन याच्यावर माईंड गेम करायचा प्रयत्न सुरु केला होता पण अभिनंदन यांनी कोणतीही गुप्त माहिती पाकिस्तानला दिली नव्हती. अभिनंदन याना १ मार्च रोजी अटारी वाघा बोर्डर वरून मायदेशी पाठविले गेले होते.

Leave a Comment