कोरोना इफेक्ट, हज यात्रेकरुंचे व्हिसा सौदी सरकारने केले रद्द


फोफो सौजन्य महाराष्ट्र टाईम्स
चीनबाहेर झपाट्याने संक्रमण होत असलेल्या करोना विषाणूवर नियंत्रणाची उपाययोजना म्हणून सौदी सरकारने पवित्र हज यात्रा सुरु होण्यापूर्वीच गुरुवारी या यात्रेसाठी परदेशी भाविकांना दिलेले व्हिसा रद्द केले आहेत. पश्चिम आशिया मध्ये करोनाची लागण झालेल्यांची संख्या २४० वर गेल्याने आणि इराण मध्ये करोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचे लक्षात घेऊन ह निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

मक्का आणि काबा येथे विदेशी नागरिकांना जाऊ दिले जात नसल्याचेही समजते. सौदी मध्ये अजून एकही करोना बाधित केस सापडलेली नाही मात्र ज्या देशातून हज यात्रेसाठी यात्रेकरू येतात, त्या अनेक देशात करोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे या देशतील लोकांना व्हिसा न देण्याचा निर्णय घेतला गेला असे सरकारने स्पष्ट केले आहे. विषाणू प्रसार नियंत्रणासाठीचे सर्व उपाय आणि सर्व आंतरराष्ट्रीय मानके पाळली जातील असेही सरकारने जाहीर केले आहे.

सौदीने त्यांच्या नागरिकांनाही करोना प्रभावित देशात जाऊ नये असे आवाहन केले आहे. पश्चिम आशियात करोनाचा सर्वाधिक प्रभाव इराणमध्ये असून तेथे १४१ लोकांना या विषाणूची लागण झाली असून २२ लोक या विषाणूचे बळी ठरले आहेत. कुवेत मध्ये करोनाचा संसर्ग वाढत असून बहारीन मध्येही आत्तापर्यंत ३३ केस आढळल्या आहेत.

Leave a Comment