हिंगोली जिल्ह्यात अनेक गावात जमिनीतून गुढ आवाज


फोटो सौजन्य युट्यूब
महाराष्ट्राच्या हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावात जमिनीतून गुढ आवाज येत असून काही वेळा जमीन थरथरते आहे यामुळे गावकऱ्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. लोक रात्री घरात झोपण्याऐवजी घराबाहेर बसून रात्र काढत असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुवार सकाळपासून जमिनीतून गुढ आवाज येत आहेत शिवाय हादरे बसत आहेत. संबंधित प्रशासकीय यंत्रणेला या घटनेची माहिती दिली गेली आहे पण अजून कुणीही या गावात आलेले नाही असेही समजते. कळमनुरी तालुक्यातील बोथी, पवनमारी, देववाडी, कुंभारवाडी या गावात गुरुवारी पहाटेपासून जमिनीतून विचित्र आवाज येत आहेत त्यामुळे अंधारातच गावकऱ्यांनी घरे सोडून पळ काढला. हे आवाज वारंवार येत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे आणि अफवांचे पिक आले आहे.

या गावातील लोकांनी रात्रभर घराबाहेर जागे राहण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे वंगमत तालुक्यात अनेक गावात भूकंपाचे धक्के जाणवत आहेत.

Leave a Comment