फ्लोरिडा येथे ५० वर्षानंतर दिसला रेनबो स्नेक


फोटो सौजन्य एनबीसी
जगभरात अनेक प्रकारचे साप आहेत आणि साप म्हटले की पहिली भावना भीती हीच असते. त्यापोटी अनेक साप मारले जातात आणि यामुळे सापांच्या काही जाती आता विलुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. अमेरिकेच्या फ्लोरिडा मधील लोकांमध्ये मात्र एका सापाच्या दर्शनाने उत्साह पसरला असून या सापाचे दर्शन ५० वर्षानंतर झाले आहे. या सापाचे वैशिष्ट म्हणजे तो पाणसाप आहे आणि सप्तरंगी आहे. त्यामुळे त्याला रेनबोस्नेक असे नाव आहे.

पृथ्वीवर रेनबो स्नेकचे अस्तित्व पूर्वीपासून आहे मात्र ही प्रजाती आता विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे. फ्लोरिडाच्या ओकला राष्ट्रीय वनात ट्रेकिंग साठी गेलेल्या ट्रेसी हिला हा साप दिसला. चार फुट लांबीच्या या सापाच्या अंगावर रंगीबेरंगी पट्टे आहेत. त्याचा फोटो एफडब्यूसी फिश अँड वाईल्ड लाईफ रिसर्च इन्स्टिट्यूटने फेसबुकवर शेअर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे साप विषारी नाहीत. त्याच्यापासून माणसाचे कोणतेही नुकसान होत नाही. ते सहजी दिसतही नाहीत कारण प्रामुख्याने ते पाण्यात राहतात. त्याच्या संरक्षणाची मागणी वन्यजीव प्रेमी करत आहेत. हा साप पाण्याची पातळी कमी झाल्याने जमिनीवर आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment