आता रेल्वे स्टेशनवर झिरो बिल ‘सोलर वॉटर कुलर’

भारतीय रेल्वे सौर उर्जेवर चालणाऱ्या उपकरणांवर भर देताना दिसत आहे. यातच आता रेल्वेने अनेक रेल्वे स्टेशनवर सौर उर्जेवर (सोलर) आधारित वॉटर कुलर बसवले आहेत.

हे वॉटर कुलर सौर उर्जेवर आधारित असल्याने इलेक्ट्रिक कुलर्सच्या तुलनेत याच्या दुरूस्तीसाठी अधिक खर्च येत नाही व याचे वीज बिल देखील येत नाही. मुंबई विभागातील मध्ये रेल्वे झोनच्या इलेक्ट्रिक विभागाने सौर वॉटर कुलर्सची संकल्पना अगदी यशस्वीरित्या आमलात आणली आहे.

2018 मध्ये सौर वॉटर कुलर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आसनगाव स्टेशनवर बसविण्यात आले होते. आता मुंबई विभागातील रोहा, आपटा, नेरळ, लोणावळा स्टेशन आणि पुणे विभागातील तळेगाव स्टेशनवरती सौर उर्जेवर आधारित वॉटर कुलर बसविण्यात आलेले आहेत.

सौर वॉटर कुलरची प्रक्रिया ही हिट ट्रांसपर (उष्णता हस्तांतरण) तत्वावर चालते. थंड फॅब्रिकद्वारे झाकलेल्या तांब्याच्या पाईपमधून जेव्हा पाणी जाते, त्यावेळी फॅब्रिक वॉटर ड्रिपिंग सिस्टमद्वारे सुरू होते. या प्रक्रियनंतर बाष्भीभवनाद्वारे पाण जमा होते.

सर्वसाधारणपणे वापरण्यात येणाऱ्या कुलरचे तुलनेत सौर वॉटर कुलर अधिक वर्ष टिकतात. हे कुलर 10 वर्षांपेक्षा अधिक काळ चालतात, तर इलेक्ट्रिक कुलर हे 4 ते 5 वर्षात खराब होतात. सौर वॉटर कुलरची पाणी क्षमता 150 लीटर तर सोलर पॅनेल कॅपिसिटी 25 वॉट आहे.

सौर वॉटर कुलरचे फायदे म्हणजे याच्यासाठी शून्य बिल आणि शून्य दुरूस्ती खर्च येतो. तर इलेक्ट्रिक कुलर वर्षाला 1620 Kwh पॉवर यूनिट खर्च करतात. सौर वॉटर कुलर प्रति यूनिटमागे 29,160 रुपयांची बचत करतात. यासोबतच पाण्याची गुणवत्ता देखील अधिक चांगली असते.

Leave a Comment