एलजीचा ड्युअल स्क्रीन ‘व्ही60 थिनक्यू’ लाँच

स्मार्टफोन कंपनी एलजीने आपल्या व्ही सीरिजमधील व्ही60 थिनक्यू 5जी (LG V60 ThinQ 5G) स्मार्टफोनला जागतिक बाजारपेठेत लाँच केले आहे. या फोनमध्ये युजर्सला ड्युअल स्क्रीन, दमदार बॅटरी, लेटेस्ट प्रोसेसर आणि शानदार कॅमेरा मिळेल. या आधी कंपनीने या सीरिजमधील व्ही50 थिनक्यू 5जीला लाँच केले होते. हा फोन भारतात कधी लाँच होणार याबाबत अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

या फोनच्या किंमतीबद्दल देखील कंपनीने खुलासा केलेला नाही. या फोनच्या क्लासी ब्लू आणि व्हाइट रंगाच्या व्हेरिएंटची विक्री पुढील महिन्यापासून युरोप, अमेरिका आणि आशियामध्ये सुरू होईल.

Image Credited – 9to5google

कंपनीने या फोनमध्ये डिटॅचेबल ड्युअल स्क्रीन दिली आहे. त्यातील एक स्क्रीन 6.8 इंच फुल एचडी डिस्प्ले (रिझॉल्यूशन 1080×2460 पिक्सल) आणि दूसरा 2.1 इंचचा मोनोक्रोमिक कव्हर डिस्प्ले आहे. दुसऱ्या डिस्प्लेवर नॉटिफिकेशन आणि वेळेची माहिती मिळेल. सोबतच या फोनमध्ये लेटेस्ट क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 एओसी प्रोसेसर दिला आहे. हा फोन अँड्राईड 10 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो.

Image Credited – NDTV

स्टोरेजबद्दल सांगायचे तर यामध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आलेले आहे.

एलजी व्ही60 थिनक्यू 5जी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलेला आहे. यातील प्रायमेरी कॅमेरा 64 मेगापिक्सल, 13 मेगापिक्सलचा सुपर वाइड अँगल सेंसर आणि टाइम ऑफ लाइट सेंसर कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी फ्रंटला 10 मेगापिक्सल कॅमेरा मिळेला.

Image Credited – slashgear

या फोनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याची 5000 एमएएचची दमदार बॅटरी आहे. या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5जी, LTE, वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, एनएफसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम ऑडिओ जॅक मिळेल.

Leave a Comment