तुम्ही पाहिले का रेल्वेच्या डब्ब्यांची ही 2 रेस्टोरंट

भारतीय रेल्वेच्या इस्टर्न रेल्वे झोनने (पूर्व रेल्वे विभाग) गेली अनेक दिवसांपासून पडून असलेल्या दोन रेल्वेच्या डब्ब्यांचे रुपांतर रेस्टोरंटमध्ये केले आहे. हे रेस्टोरंट पश्चिम बंगालच्या असानसोल रेल्वे स्टेशनच्या भागात सुरू करण्यात आले आहे. ‘रेस्टोरंट ऑन व्हिल्स’ असे नाव देण्यात आलेल्या या रेस्टोरेंटमध्ये प्रवासी आणि इतर सर्वसामान्य नागरिक देखील येऊ शकतात.

रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, एमईएमयूच्या दोन डब्ब्यांना बदलून रेस्टोरंटचे स्वरूप देण्यात आलेले आहे. याद्वारे पुढील 5 वर्षात 50 लाख रुपये उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.

Image Credited – livemint

यातील पहिल्या डब्ब्यामध्ये चहा आणि स्नॅक्स दिले जातील. तर दुसऱ्या डब्ब्यात 42 जणांना बसण्यासाठी जागा आहे. येथे प्रवासी आणि सर्वसामान्यांना जेवण, नाश्ता करता येईल.

Image Credited – livemint

या रेस्टोरंटचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांच्या हस्ते पार पडले. यावेळी दोन नवीन एअर-कंडिशन्ड रिटायरिंग रुम, इलेक्ट्रॉनिक रिझर्व्हेशन चार्ट डिस्प्ले सिस्टम आणि बॅटरीवर चालणाऱ्या कारचे देखील सुप्रियो यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

याआधी पुर्व मध्ये रेल्वेने देखील अशाच प्रकारे दानापूर कोचिंग डेपोमध्ये रिकाम्या पडलेल्या एका डब्ब्याचे कॅन्टिनमध्ये रुपांतर केले होते.

Leave a Comment