मी 3000 वर्षांचा वॅम्पायर – इलॉन मस्क

टेस्ला आणि स्पेस एक्सचे संस्थापक इलॉन मस्क हे आपल्या ट्विटमुळे नेहमीच चर्चेत असतात. मस्क यांच्याविषयी गुगल सर्च केल्यास ते टाईम ट्रॅव्हलर, एलियन आणि वॅम्पायर आहेत, अशा अनेक थेअरी तुम्हाला आढळतील. मात्र आता या गोष्टीला स्वतः इलॉन मस्क यांनी दुजोरा दिला आहे. एलॉन मस्क यांनी ट्विट करून स्वतः सांगितले की, आपण 3000 वर्षांचे वॅम्पायर आहे.

इलॉन मस्क यांनी ट्विट केले की, त्यांची कंपनी स्पेसएक्सने स्टारशिप एसएन1 साठी सभा घेण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी सांगितले की, तसेच कंपनीने आधी झालेल्या चुकांमध्ये सुधारणाकरून मोठे बदल केले आहेत.

या ट्विटवर एका युजरने 1893 मध्ये जन्मलेल्या कॅनेडियन पायलट रेयमंड कॉलिशॉवचा फोटो शेअर करत लिहिले की, वेळ वाचवण्यासाठी कधी टाईम ट्रॅव्हलचा विचार केला आहे का ? सोबत युजरने विचारले की, 1914 मध्ये तुम्ही कॅनेडामध्ये काय करत होता ? आणि तुमचे नाव रेयमंड कॉलिशॉव का होते व तुमचा व्यवसाय फायटर पायलट का होता ?

रेयमंड कॉलिशॉवच्या फोटोकडे व्यवस्थित पाहिल्यानंतर इलॉन मस्क आणि त्याच्या चेहऱ्यात थोडेफार साम्य दिसून येत आहे.

या ट्विटला मस्क यांनी मजेशीर उत्तर देताना लिहिले की, मी खरे तर 3000 वर्षांचा वॅम्पायर आहे. गेली शतकानुशतके धारणा करून ठेवलेल्या खोट्या ओळखीवर हे एक परिक्षण आहे.

विशेष म्हणजे इलॉन मस्क यांच्या या विचित्र खुलाशानंतर देखील अनेकांना याचे काहीही आश्चर्य वाटले नाही. अनेक युजर्सनी लिहिले की, आम्हाला हे आधीपासूनच माहिती होते.

Leave a Comment