आता या एअरलाईनच्या इकोनॉमी क्लासमध्ये सुद्धा झोपण्याची सोय

विमानाने प्रवास करताना कमी पैसे खर्च करून झोपणाऱ्यांसाठी एअर न्यूझीलंडने इकोनॉमी क्लाससाठी स्लिपिंग पॉड तयार केले आहेत. या स्लिपिंग पॉडला ‘स्कायनेस्ट’ नाव देण्यात आलेले आहे. एअरलाईनने याच्या पेटंट आणि ट्रेडमार्कसाठी अर्ज केला आहे. पॉड्सला ऑकलँडच्या हँगरमध्ये 200 ग्राहकांवर चाचणी केल्यानंतर बनविण्यात आले आहे. यासाठी 3 वर्ष लागले.

एअर न्यूझीलंडनुसार, विमानाच्या इकोनॉमीच्या केबिनमध्ये 6 फूल लेंथ फ्लॅट स्लीप पॉड्स असतील.

Image Credited – Matador Network

प्रत्येक पॉड्स 200 सेंमी लांब आणि 58 सेंमी रुंद आहे. याच्या आत एक उशी, बेडशीट, ब्लँकेट, एअर प्लग्स आणि एक पडदा असेल. यासोबतच पुस्तक वाचण्यासाठी लाईट, यूएसबी पोर्टची देखील सुविधा असले. यावर्षी ऑक्टोंबरपासून ही सेवा सुरू होईल. ही सेवा जगातील सर्वात लांब उड्डाणामध्ये (ऑकलँड ते न्यूयॉर्क) सुरू होईल.

Image Credited – New York Post

एअर न्यूझीलंडचे मार्केटिंग चीफ आणि कस्टमर ऑफिस माइक टॉड यांनी सांगितले की, लांबचा प्रवास करणाऱ्या इकोनॉमी क्लासच्या प्रवाशांचा थकवा दुर करण्यासाठी ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.

एअर न्यूझीलंडच्या कर्मचाऱ्याने सांगितले की, प्रवाशांच्या सर्व गरजा ओळखून स्कायनेस्टला डिझाईन करण्यात आले आहे. मात्र यासाठी ग्राहकांना किती अधिक पैसे खर्च करावे लागतील, याचे आकलन करायचे आहे. त्यानंतरच ही सेवा व्यावसायिक स्वरूपात सुरू केली जाईल.

Leave a Comment