येथे सापडली हजारो वर्ष जुनी शेकडो सोन्याची नाणी

तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील थिरुवनाईकल येथील जम्बुकेश्वर मंदिराचे नुतनीकरण करण्यासाठी खोदकाम करताना हजारो वर्ष जुनी सोन्याची नाणी सापडली आहे. खोदकाम करताना 7 फूट खोल एक तांब्याचे भांडे दिसले. या भांड्याला बाहेर काढल्यावर त्याच्यातून 1.716 किलो वजनाची 505 सोन्याची नाणी सापडली.

या नाण्याची किंमत 68 लाख रुपये सांगितली जात असून, ही नाणी 1 हजार ते 1200 वर्ष जुनी आहेत. या नाण्यांना मंदिर प्रशासनाने पोलिसांच्या हवाली केले आहे.

मंदिर प्रशासनानुसार, जम्बुकेश्वर मंदिराचे खोदकाम सुरू असताना हा कलश सापडला. यानंतर मंदिर अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली. या सोन्याच्या नाण्यावर अरबी भाषेत काहीतरी लिहिलेले आहे.

जिल्हाधिकारी सिवारासू यांच्यानुसार, या नाण्यांबाबत स्टेट आर्कलॉजिकल डिपार्टमेंटला सूचना देण्यात आलेली आहे.

Leave a Comment