माही करणार कलिंगड आणि पपईची शेती


फोटो सौजन्य डीएनए इंडिया
टीम इंडियाचा माजी कॅप्टन कुल म्हणजे आपला महेंद्रसिंग धोनी क्रिकेटमधून सध्या तरी संन्यास घेत नाही हे आता स्पष्ट झाले आहे कारण १ मार्च पासून माही पुन्हा क्रिकेट सरावासाठी मैदानात उतरत आहे आणि आयपीएल चेन्नई सुपरकिंग संघाचे नेतृत्व करणार आहे. पण क्रिकेट संन्यास घेतलाच तर माही काय करू शकतो याची एक झलक माहीने दोन मिनिटांचा व्हिडीओ शेअर करून दाखविली आहे.

या व्हिडीओ मध्ये माही शेतकरी बनून शेतात पेरणी करताना दिसतो आहे. धोनी ऑर्गेनिक शेतीचे धडे घेत असून त्याने रांची मध्ये त्याच्या शेतात कलिंगड आणि पपईची लागवड केली आहे. त्यापूर्वी त्याने शेताची पेरणीपूर्व पूजा केली असून त्याला या कामी शेतीतज्ञ मार्गदर्शन करत आहेत. धोनी म्हणतो, शेतीविषयी खूप उत्सुकता आहे. रांची मध्ये गेले २० दिवस शेती काम करत आहे.

३८ वर्षीय धोनी २०१९ च्या वर्ल्ड कप सेमीफायनल मध्ये टीम इंडियाचा पराभव झाल्यापासून क्रिकेटपासून दूर आहे. गेले सात महिने तो मैदानात उतरलेला नाही. मात्र आता आयपीएल साठी तो पुन्हा कप्तान म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.

Leave a Comment