ब्राझीलच्या कार्निव्हलमध्ये गणपतीबाप्पाचा रथ


फोटो सौजन्य भास्कर
ब्राझीलची राजधानी रिओ द जानेरो येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच दिवसांचा वार्षिक कार्निव्हल नुकताच संपन्न झाला. शनिवारी सुरु झालेला हा सोहळा बुधवारी संपला. यंदाच्या कार्निव्हलचे वैशिष्ट ठरला आपला गणपती बाप्पा. म्हणजे दरवर्षी या कार्निव्हलमध्ये जे सांबा स्कूल यांचे शोभारथ मिरवणुकीत आणतात, त्यात पेरोला नेग्रा स्पेशल सांबा स्कूलने त्यांच्या रथावर चक्क आपल्या गणपती बाप्पांची स्थापना केली होती. हा रथ उपस्थित प्रेक्षकांचे खास आकर्षण ठरला.


ब्राझीलच्या या जगप्रसिध्द कार्निव्हलची सुरवात १६४० मध्ये झाली असे मानले जाते. पण या कार्निव्हल मध्ये मुखवटे घालून सामील होण्याची प्रथा त्यानंतर २०० वर्षांनी म्हणजे १८४० साली सुरु झाली. इटली कार्निव्हलपासून प्रेरणा घेऊन ही प्रथा येथे रुजली असे सांगितले जाते. १९१७ पासून मात्र सांबा परेड नृत्य केले जाऊ लागले. यंदाच्या परेडमध्ये १३ सांबा स्कूल्सनी विविध विषयावरचे शोभारथ मिरवणुकीत आणले होते. हजारो पर्यटक हा सोहळा पाहण्यासाठी दरवर्षी रिओ मध्ये हजेरी लावतात. पाच दिवस हा उत्सव चालतो आणि प्रत्येक गटाला सादरीकरणासाठी १ तासाचा वेळ दिला जातो.

Leave a Comment