टर्कीमध्ये या व्यक्तीला प्लास्टिकमध्ये बांधून पाठवले घरी

टर्किश एअरलाईन्समध्ये एका व्यक्तीला बनावट व्हिसा असल्यामुळे चक्क बब्बल व्रॅप असणाऱ्या प्लास्टिकमध्ये बांधून पुन्हा त्याच्या देशात पाठवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

47 वर्षीय इम्युनल चेडजो हा मुळचा कॅमेरूनचा आहे. तो एक बुट विक्रेता आहे. व्हिडीओमध्ये तो म्हणत आहे की, त्यांना मला मारायचे आहे. त्यांनी मला एखाद्या पॅकेजप्रमाणे विमानात ठेवले आहे. श्वास घेण्यास देखील अडचण येत आहे.

व्हिडीओमध्ये देखील दिसत आहे की, इम्युनलला प्लास्टिकमध्ये गुंडाळण्यात आले आहे व इतर प्रवासी देखील चिंतेत आहेत.

इम्युनलने आपल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, तो एका बिझनेस ट्रिपवर गेला होता. इस्तानबुल विमानतळावर तो काहीवेळासाठी उठून बाहेर गेला. तेव्हा पासपोर्ट कंट्रोल अधिकाऱ्यांनी त्याला पकडले. त्यांनी सांगितले की व्हिसा बनावट असून, त्यामुळे पकडण्यात आले आहे.

इम्युनलने सांगितले की, त्याने तिकीट एका ट्रॅव्हल एजेंसीकडून घेतले होते. पकडल्यानंतर अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला एक खोलीत नेले. तेथे प्लास्टिकद्वारे त्याचे हात, पाय बांधण्यात आले. त्याला दुबईला जायचे होते, मात्र त्याला पुन्हा कॅमेरूनला पाठवण्यात आले.

या घटनेवेळी इम्युनलचा मित्र देखील त्याच्यासोबत होता. त्याच्या मित्राने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड करत सोशल मीडियावर शेअर केला.

Leave a Comment