आता एसबीआयद्वारे स्वस्तात खरेदी करा प्रॉपर्टी

देशातील सर्वात मोठी बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) आज (26 फेब्रुवारी 2020) मेगा ई-ऑक्शन करणार आहे. या मेगा ऑक्शनमध्ये देशभरातील अनेक शहरांमधील घर-दुकानांचा लिलाव केला जाणार आहे. लिलावात संपत्ती खरेदी केल्यास तुम्हाला कर्ज देखील मिळेल. बँकेचे कर्ज चुकवण्यास असक्षम ठरलेल्या लोकांची ही संपत्ती आहे.

एसबीआयने थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांची संपत्ती लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुम्ही देखील घर अथवा दुकान खरेदी करू इच्छित असाल तर ही चांगली संधी आहे. या लिलावात भाग घेण्यासाठी तुम्हाला आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल. यासाठी बँक तुमच्याकडून काही माहिती देखील मागेल.

यासाठी ई-ऑक्शन नोटीसमध्ये उल्लेख केलेले ईएमडी, संबंधित बँक शाखेत ईमेल आयडी आणि पासवर्ड (ईएमडी) आणि केवायसी कागदपत्रे जमा करावी लागतील. त्यानंतर ऑक्शनतर्फे बोली लावणाऱ्यांना माहिती मिळेल.

रजिस्ट्रेशन व अधिक माहितीसाठी तुम्हाला http://sbi.auctiontiger.net अथवा www.bankeauctions.com/sbi  या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

Leave a Comment