राहुल द्रविडच्या मुलाची तुफानी खेळी

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविड काही दिवसांपुर्वीच दोन महिन्यात दोन द्विशतक झळकवल्याने चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा समित आपल्या शानदार कामगिरीमुळे चर्चेत आला आहे.

समित द्रविडने बीटीआर शिल्ड अंडर-14 स्पर्धेत मल्या आदिती आंतरराष्ट्रीय शाळेकडून खेळताना 131 चेडूंमध्ये 166 धावांची शानदार खेळी केली. यामध्ये 24 चौकारांचा समावेश होता. यासोबतच त्याने गोलंदाजीमध्ये 35 धावा देत 4 विकेट्स घेत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सोबतच आपल्या संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले.

समितच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर मल्या आदिती आंतरराष्ट्रीय शाळेने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावत 330 धावांचा विशाल स्कोर केला. या धावांचा पाठलाग करण्यास मैदानात उतरलेला विद्याशिल्प अकादमीचा संघ 38.5 ओव्हरमध्ये सर्वबाद 182 धावापर्यंतच मजल मारू शकला.

याआधी 15 फेब्रुवारीला पार पडलेल्या श्री कुमारन चिल्ड्रन्स अकादमी विरुध्दच्या सामन्यात समितने 146 चेंडूमध्ये 33 चौकारांच्या सहाय्याने 201 धावा केल्या होत्या. तसेच त्याआधी डिसेंबर 2019 मध्ये त्याने 295 धावांची शानदार खेळी देखील केली होती.

Leave a Comment