IPL 2020 : जाणून घ्या कर्णधारांना पगार किती

लवकरच इंडियन प्रिमियर लीग अर्थात आयपीएलचे बिगुल वाजणार आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मैदानाबाहेर असलेला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी देखील आयपीएलच्या निमित्ताने मैदानावर परतणार आहे. यंदाच्या वर्षी देखील महेंद्रसिंह धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे भारतीय खेळाडू आपल्या संघाचे नेतृत्व करणार आहेत. मात्र हे खेळाडू एका सीझनद्वारे किती कोटींची कमाई करतात तुम्हाला माहितीये ?

Image Credited – Amarujala

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने  वेळा विजेतेपद पटकावले आहे. यंदाच्या सीझनसाठी रोहितला मुंबई इंडियन्सच्या फ्रेंचाईजीकडून 15 कोटी रुपये मिळणार आहेत.

Image Credited – Amarujala

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथ आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 संघांकडून खेळला आहे. यंदाच्या सीझनमध्ये तो राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सांभाळणार असून, यासाठी त्याला जवळपास 12 कोटी रुपये पगार मिळणार आहे.

Image Credited – Amarujala

पहिल्या सीझनपासून चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असलेल्या महेंद्रसिंह धोनीने संघाला 3 वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे. यंदाच्या सीझनमध्ये धोनीला फ्रेंचाईजीकडून 15 कोटी रुपये मिळणार आहेत.

Image Credited – Amarujala

2013 पासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीला यंदा फ्रेंचाईजीकडून 17 कोटी रुपये मिळणार आहेत.

Image Credited – Amarujala

दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करणाऱ्या श्रेयस अय्यरला यंदाच्या सीझनसाठी 7 कोटी रुपये पगार मिळणार आहे.

Image Credited – Amarujala

2020 मध्ये किंग्ल इलेव्हन पंजाबचे नेतृत्व केएल राहुल करणार आहे. यासाठी त्याला फ्रेंचाईजीकडून 11 कोटी रुपये पगार मिळेल.

Image Credited – Amarujala

आयपीएल 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या केन विलियम्सनला यंदा 3 कोटी रुपये पगार मिळणार आहे.

Image Credited – Amarujala

आयपीएलच्या 13 व्या सीझनमध्ये कोलकत्ता नाइट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिक असणार आहे. यासाठी त्याला 7.4 कोटी रुपये मिळणार आहेत.

Leave a Comment