इंजमामने क्रिकेटपटूंना दिले ‘सचिन चँलेज’

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक हे आपल्या काळात एकमेंकाचे प्रतिस्पर्धी होते. अनेक विक्रमाबाबत दोघांची तुलना केली जात असे. मात्र आता इंजमामने सचिन तेंडूलकरचे कौतूक केले असून, सोबतच जगभरातील क्रिकेटपटूना एक खास सचिन चँलेज देखील दिले आहे.

सचिन तेंडूलकरचा विक्रम कोण मोडेल हे इंजमामला पाहायचे आहे. इंजमामने क्रिकेटपटूना चँलेज देत म्हटले की, आंतरराष्ट्रीय क्रिक्रेटमध्ये सर्वाधिक धावांचा सचिन तेंडूलकरचा विक्रम कोण मोडतो, हे पाहावे लागेल.

युट्यूब चॅनेलवर इंजमाम म्हणाला की, त्याचा जन्म क्रिकेटसाठीच झाला आहे. मला नेहमी वाटते की क्रिकेट आणि तो एकमेंकासाठी बनलेले आहेत. मी ग्रेट सचिन तेंडूलकरबद्दल बोलत आहे.

तो म्हणाला की, मला या गोष्टीचे आताही आश्चर्य वाटते की, त्याने वयाच्या 16-17 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि शानदार कामगिरी केली. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्ही तुम्ही असाधारण असता. असाधारण पेक्षाही पुढे जर कोणी असेल, तर तो सचिन आहे. सचिनने वकार यूनूस आणि वसीम अक्रम यांच्यासमोर 16 व्या वर्षी पदार्पण केले. ज्या प्रमाणे फलंदाजी केली, क्रिकेट खेळले, ते चमत्कारिक आहे.

पाकिस्तानचा माजी कर्णधार असलेला इंजमाम म्हणाला की, सचिनचे दुसरी मोठी विशेषता म्हणजे त्याचे विक्रम आहे. त्यावेळी एवढ्या धावा कोणी करत नसे. महान खेळाडू आठ, साडे आठ धावा करायचे. केवळ सुनील गावस्कर यांनी 10 हजार धावा केल्या होत्या व असे वाटायचे की हा विक्रम तुटणार नाही. मात्र सचिनने हा विक्रम तोडला. आता मला सचिनचा विक्रम कोण तोडेल, हे पाहायचे आहे.

Leave a Comment