येथे चक्क गाद्यांवर उगवण्यात आल्या भाज्या

ब्रिटिश वैज्ञानिकांनी खराब झालेल्या मॅट्रेसच्या गाद्यांचा वापर करून जॉर्डन येथील वाळवंटात टोमॅटो, कोथिंबीर, मिर्ची, वांगे यासह अनेक भाज्यांचे उत्पादन केले आहे. याला डेजर्ड गार्डन असे नाव देण्यात आलेले आहे.

वैज्ञानिकांचे म्हणणे आहे की, निर्वासित छावणीमध्ये हा प्रयोग पुर्णपणे यशस्वी ठरला. आता हा प्रयोग अन्य वाळवंटी भागात आणि नापीक जमिनीवर केला जाईल.

Image Credited – Bhaskar

यूनिवर्सिटी ऑफ शेफील्डचे वैज्ञानिक प्रोफेसर टोनी रयान यांनी सांगितले की निर्वासित छावण्यांमध्ये हजारो अशा गाद्या टाकून दिल्या जातात, ज्याचे रुपांतर कचऱ्यात होते. आम्ही या गाद्यांमध्ये काही सुपीक व पोष्टिक घटकांचा समावेश केला व त्याद्वारे सिंथेटिक माती बनवली. या मातीमध्ये भाज्या व औषधी वनस्पती उगवण्याचा प्रयत्न केला. या प्रयोगाची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात 70 ते 80 टक्के पाण्याचा कमी वापर होतो.

Image Credited – Bhaskar

रयान यांनी सांगितले की, हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञानामध्ये झाडांना मातीच्या ऐवजी पाणी आणि आवश्यक पोषक तत्वांमध्ये मिसळून उगवण्यात येते. जेव्हा मुळे मोठी होतात, तेव्हा यांना गाद्यांपासून बनविण्यात आलेल्या सिथेंटिक मातीमध्ये लावण्यात येते. हा प्रयोग 1000 सीरियन शरणार्थी आणि तेथील शेतकऱ्यांच्या सहकार्याने यशस्वी झाला.

शेफील्डचे संशोधक या तंत्रज्ञानाद्वारे 2 लाख 50 हजार पाउंड जमा करणार आहेत. जेणेकरून या पैशांद्वारे अन्य 3 हजार निर्वासितांना ही पद्धत शिकवता येईल. संयुक्त राष्ट्र या निर्वासितांसाठी चपाती आणि भाजीची व्यवस्था करते. मात्र त्यांना पोष्टिक फळ, भाज्या आणि अन्य गोष्टींसाठी डेजर्ट गार्डनची गरज आहे.

Leave a Comment