दिल्ली हिसांचारावरून चेतन भगत आणि अनुपम खेरमध्ये जुंपली

दिल्लीत मागील दोन दिवसांपासून नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरून सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. सर्वसामान्यांबरोबरच सेलिब्रेटीज देखील याबाबत ट्विट करत आहे.

दिल्लीतील या परिस्थितीवर प्रसिद्ध लेखक चेतन भगतने देखील ट्विट केले होते. त्यावर आता अभिनेते अनुपम खेर यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

चेतन भगत यांनी ट्विट केले की, 1947 मध्ये भारतात हिंदू मुस्लिम, हिंदु मुस्लिम, तर जग चंद्रावर पोहचले, कॉम्प्युटर्स, इंटरनेट, आर्टिफिशयल इंटेलिजेंस, सेलफोन्स, स्मार्टफोन, अॅप्स. मात्र भारतात 2020 मध्ये देखील हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिमच सुरू आहे.

चेतन भगत यांच्या या ट्विटला अभिनेते अनुपम खेर यांनी उत्तर दिले आहे.

अनुपम खेर यांनी उत्तर दिले की, या ट्विटसोबत तुम्ही केवळ स्वतःचे नाहीतर लाखो भारतीयांचे महत्त्व कमी करत आहात. हिंदू आणि मुस्लिम दोघांचेही. मागील 72 वर्षात भारताने सर्वक्षेत्रात यश मिळवले आहे. हे एक स्मार्ट ट्विट आहे, मात्र सत्यापासून खूप लांब आहे.

Leave a Comment