केवळ माणसेच नाही तर पैसाही खातायेत विविध विषाणू


फोटो सौजन्य व्हेक्टर स्टोक
सध्या चीनमध्ये प्रकोप झालेल्या करोनाची लागण जगातील अनेक देशात होत असून त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. करोनामुळे झालेल्या मृत्यूचे आकडे रोज वाढत असून या विषाणूचे शेअर बाजाराशीही कनेक्शन दिसून येत आहे.

या संदभात घेतलेल्या शोधात गेल्या १७ वर्षात विविध विषाणूंचा शेअर बाजारावर परिणाम झाला असून गुंतवणूकदारांचे लाखोंचे नुकसान झाले आहे असे दिसून येत आहे. विशेष म्हणजे या विषाणूंचा परिणाम जागतिक मार्केट बरोबर भारतीय बाजारावरही पडला आहे. २००३ मध्ये जानेवारी ते मार्च या काळात सार्स नावाच्या विषाणूचा प्रकोप झाला होता त्यावेळीही जगभरातील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी भारतीय बाजाराने निफ्टी ११.१ निगेटिव्ह रिटर्न दिले होते.

२००४ मध्ये एवियान विषाणूमुळे निफ्टी १४.७ निगेटिव्हवर गेला होता तर २०१२ मध्ये मर्स विषाणूमुळे निफ्टी ११.८ निगेटिव्ह नोंदविला गेला होता. २०१७ मध्ये झिकाचा असाच निगेटिव्ह प्रभाव पडला होता आणि आज करोना मुळे भारतीय शेअर बाजार दररोज कोसळतो आहे. त्यामुळे भारतीय गुंतवणूकदारांना मोठे नुकसान सोसावे लागते आहे.

अश्या विषाणूंच्या प्रकोपामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होतेच पण उद्योग जगातलासुद्धा त्याची किंमत मोजावी लागते कारण याचा परिणाम प्रभावित भागातील कारखाने बंद पडण्यावर होतो व त्यामुळे सुट्या भागाचा पुरवठा होऊ शकत नाही. परिणामी वस्तूंचे दर वाढतात, महागाई वाढते त्यांनी त्याची झळ सर्वसामान्य जनतेला सोसावी लागते.

Leave a Comment