1 मार्चपासून या देशात सार्वजनिक वाहतूक सर्वांसाठी मोफत

दिल्लीमध्ये महिलांसाठी सार्वजनिक बसमधून प्रवास करणे मोफत आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र 1 मार्चपासून एका देशातील सर्व नागरिकांसाठी रेल्वे अथवा बसमधून प्रवास करणे मोफत केले जाणार आहे. या देशाचे नाव लग्झमबर्ग असून, अशी सुविधा देणारा हा पहिलाच देश आहे.

लग्झमबर्ग हा यूरोपमधील सातवा सर्वात लहान, मात्र श्रींमत देश आहे. येथे 1 मार्चपासून रेल्वे, ट्राम आणि बसमधून प्रवास करण्यासाठी पैसे घेतले जाणार नाहीत. देशातील नागरिकांसाठी परिवहनाची सर्व सुविधा मोफत असतील. केवळ देशातील नागरिकांसाठीच नाही तर परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी देखील ही सेवा मोफत असेल.

Image Credited – Amarujala

वर्ष 2018 मध्ये जेव्हियर बेटल यांनी लग्झमबर्गचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली होती. त्याआधी निवडणूक प्रचारात त्यांनी सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे जवळपास 6 लाख नागरिक, 1,75,000 हजार परदेशी मजूर आणि येथे दरवर्षी येणाऱ्या 12 लाख पर्यटकांना फायदा होईल.

Image Credited – Amarujala

लग्झमबर्गमध्ये सार्वजनिक वाहतूक मोफत करण्याचा मुख्य उद्देश ट्रॅफिक कमी करणे व पर्यावरणाच्या स्थितीत सुधारणा करणे हा आहे. यासोबतच श्रींमत व गरीबांमध्ये वाढत चाललेली दरी कमी करणे हा देखील उद्देश आहे. लग्झमबर्गमध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक लोक ऑफिसला जाण्यासाठी आपल्या कारचा वापर करतात. केवळ 19 टक्के लोकच सार्वजनिक वाहनांचा वापर करतात.

Image Credited – Amarujala

लग्झमर्बमध्ये सार्वजनिक वाहतुकीसाठी आधीच मोठी सबसीडी आहे. दोन तासांच्या प्रवासासाठी 2 यूरो आणि पुर्ण दिवसाच्या सेकेंड क्लास तिकीटासाठी 4 यूरोप आहे. 20 वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आधीच मोफत प्रवास करत येत असे.

Leave a Comment