सर्वोच्च न्यायालयाच्या 6 न्यायाधीशांना स्वाइन फ्लूची लागण

सर्वोच्च न्यायालयाच्या 6 न्यायाधीशांना स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याची माहिती न्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. या गंभीर मुद्यावर सरन्यायाधीश एसए बोबडे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनचे (एससीबीए) अध्यक्ष दुष्यंत दवे यांच्याशी चर्चा केली.

दवे यांनी सांगितले की, सरन्यायाधीश स्वाइन फ्लू बाबत चिंतित असून, त्यांनी न्यायालयातील सर्व लोकांना लसीकरण करण्यास सांगितले आहे.

एससीबीएने जे वकील व कर्मचारी लसीकरण करू शकत नाही अशांसाठी सुविधा देण्यासाठी 10 लाख रुपयांची मदत सादर केली आहे. एका लसीकरणासाठी 1200 रुपये खर्च येतो. सर्वोच्च न्यायालयाने डिस्पेंसरी उघडण्याचे देखील आदेश दिले आहेत.

सरन्यायाधीशांनी सांगितले की, 1-2 दिवसांमध्ये लसीकरणासाठी सुविधा सुरू केली जाईल. यासाठी नॉटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.

एससीबीएचे अध्यक्ष दवे म्हणाले की, लसीकरणासाठी 1200 रुपये प्रती व्यक्ती खर्च येईल. त्यांनी सरन्यायाधीशांकडे सर्वोच्च न्यायालयात काम करणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करण्यासंदर्भात आदेश द्यावे असे म्हटले आहे. सहा न्यायाधीशांना एच1एन1 व्हायरसची लागण झाल्यानंतर, न्यायाधीश संजीव खन्ना न्यायालयात मास्क घालून सुनावणी करताना दिसले.

Leave a Comment