नोकियाचा हा स्मार्टफोन तब्बल 15 हजारांनी झाला स्वस्त

नोकियाने आपला प्लॅगशिप स्मार्टफोन नोकिया 9 प्यूर व्ह्यूची (Nokia 9 PureView) किंमत तब्बल 15 हजार रुपयांनी कमी केली आता. आता हा फोन नोकिया कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून 34,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. भारतात हा फोन 49,999 रुपयांना लाँच झाला होता. या फोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात 20 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर देण्यात आलेले आहे.

नोकिया 9 प्यूर व्ह्यू स्मार्टफोनमध्ये 5.99 इंच क्वॉड एचडी प्लस (1440×2960 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले मिळेल. सोबतच यात क्वॉलकॉमचे ऑक्टाकोर स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर व आउट ऑफ बॉक्स अँड्रॉईड 9 पाय देण्यात आलेले आहे.

फोनमध्ये 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आलेले आहे. या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात रिअर पेंटा (5) लेंस कॅमेरे देण्यात आलेले आहे. या फोनमध्ये 5 रिअर कॅमेरे आहेत. यातील 3 लेंस 12 मेगापिक्सल मोनोक्रोम आणि इतर दोन कॅमेरे हे 2-2 मेगापिक्सल आहेत. तर फ्रंटमध्ये सेल्फीसाठी यात 20 मेगापिक्सल कॅमेरा मिळेल.

Image Credited – NDTV

हा फोन वॉटर आणि डस्टप्रुफ असून, यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. यात 3320 एमएएचची बॅटरी देण्यात आलेली असून, जी वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते.

कनेक्टिव्हिटीसाठी यात वाय-फाय 802.11एसी, ब्लूटूथ व्हर्जन 5.0, जीपीएस/ए-जीपीए, एनएफसी, 4 जी एलटीई आणि यूएसबी टाइप-सी सपोर्ट मिळेल.

Leave a Comment