बनावट लग्नांद्वारे टिव्ही चॅनेल्स असा वाढवत आहेत टीआरपी

रियालिटी टिव्ही शो ‘मुझसे शादी करोगे’ काही दिवसांपासून चर्चेत आहेत. या कार्यक्रमात ‘बिग बॉस सीझन 13’ मधील स्पर्धेक शहनाज गिल आणि पारस छाबडा स्वतःसाठी जोडीदार शोधत आहेत. मात्र ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा कार्यक्रमात एखाद्या सेलिब्रेटीसाठी मुलगा-मुलीचा शोध घेण्यात येत आहे. या आधी देखील असे अनेकवेळा झाले आहे. मात्र हा फॉर्म्युला नेहमीच यशस्वी ठरलेला नाही.

पारस आणि शहनाज हे बिग बॉस सीझन 13 या कार्यक्रमामुळे खूपच लोकप्रिय झाले. त्यानंतर आता दोघे टिव्ही शो मुझसे शादी करोगे मध्ये दिसत आहेत. शहनाजचे वडील या कार्यक्रमाच्या विरोधात होते, मात्र मेकर्सने त्याआधीच तिची परवानगी घेतली. शहनाजचे वडील संतोख सिंह म्हणाले की, या कार्यक्रमाद्वारे मेकर्स माझ्या मुलीची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.

Image Credited- Aaj tak

याआधी देखील लग्नाचे असे कार्यक्रम झालेले आहेत. याची सुरूवात 2009 मध्ये राखी सावंतच्या ‘राखी का स्वयंवर’ या कार्यक्रमाद्वारे झाली होती. मात्र या कार्यक्रमाचे कौतूक होण्याऐवजी खिल्ली उडवली गेली व राखीच्या प्रतिमेवर देखील यामुळे परिणाम झाला. याचा दुसरी सीझन देखील आला होता.

Image Credited- Aaj tak

बिग बॉसच्या सेटवर देखील स्पर्धकांनी लग्न केले आहे व त्या एपिसोडची खूपच चर्चा झाली होती. बिग बॉस सीझन 4 मध्ये सारा खान आणि अली मर्चेंटने लग्न केले होते. हा एपिसोड देखील चर्चेचा विषय ठरला होता. यामुळे कार्यक्रमाला खूपच टीआरपी मिळाली, मात्र कार्यक्रमातून बाहेर आल्यावर काही दिवसात दोघेही एकमेंकापासून वेगळे झाले.

Image Credited- Aaj tak

याशिवाय ‘राहुल का स्वयंवर’ हा कार्यक्रम देखील असाच चर्चेचा विषय ठरला होता. यामध्ये राहुल महाजनने डिंपीला आपली पत्नी म्हणून स्विकारले होते.

Image Credited- Aaj tak

नुकताच पार पडलेला रियालिटी टिव्ही शो ‘इंडियन आइडल’मध्ये जज नेहा कक्कड आणि आदित्य नारायण यांचे लग्नाची देखील विशेष चर्चा झाली. मात्र ही देखील टीआरपी मिळवण्यासाठी पसरवण्यात आलेली अफवा असल्याचे समोर आले.

अनेकदा पाहिला मिळाले आहे की पडद्यावर होणारे लग्न हे टीआरपी आणि ड्रामा असतो. कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर ही जोडपी वेगळी होतात. मात्र याचा फायदा टिव्ही चॅनेल्सला होतो.

Leave a Comment