काय आहे ‘हॅप्पीनेस क्लास’ ?, ज्याबाबत मेलानिया पण उत्सुक

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया भारत दौऱ्यावर आहेत. आज भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मेलानिया या दिल्लीच्या एका सरकारी शाळेला भेट देणार आहेत. जवळपास एक तास या शाळेला भेट देऊन मेलानिया आम आदमी पक्षाची महत्त्वकांक्षी योजना हॅप्पीनेस क्लासबद्दल जाणून घेणार आहेत.

दिल्ली सरकारने दीड वर्षांपुर्वी शाळेत हॅप्पीनेस अभ्यासक्रमाची सुरुवात केली होती. या अंतर्गत विद्यार्थ्यांचा दररोज एक क्लास घेतला जातो. याचा विद्यार्थ्यांवर देखील चांगला परिणाम होत असून, या क्लासची चर्चा आता परदेशात देखील होत आहे. मेलानिया ट्रम्प देखील या हॅप्पीनेस क्लासबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असून, या क्लासबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.

Image Credited – India Today

दिल्लीच्या सरकारी शाळेत चालणारा हॅप्पीनेस क्लास हा 45 मिनिटांचा असतो. हा क्लास शाळा सुरू असताना दररोज होतो. यात नर्सरीपासून ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी असतात. सर्वात प्रथम विद्यार्थ्यांना ध्यान करायला लावतात. यात कोणत्याही प्रकारची प्रार्थना, जाप-मंत्र, देवतांची पुजा असे काहीही नसते. यात केवळ श्वास आणि मनावर लक्ष केंद्रीत करणे, ध्यान दिले दिले. आपल्या विचारांवर लक्ष केंद्रीत केले जाते. ही भारताची प्राचीन संस्कृति आहे.

Image Credited – indianexpress

दिल्ली सरकारचे शिक्षणमंत्री मनीषसिसोदिया यांच्यानुसार, हॅप्पीनेस अभ्यासक्रमाचे चांगले परिणाम समोर आले आहेत. मुलांची अभ्यासावरील एकाग्रता वाढली आहे. मुले शांतपणे वर्गात बसतात. त्यांच्यात संस्कारांच्या प्रती जागृकता वाढते.

Image Credited – Medium

हॅप्पीनेस क्लासचा उद्देश आहे की एक विद्यार्थी जो शिक्षणात देखील हुशार आहे, तो समाजासाठी देखील एक चांगला व्यक्ती असावा. कुटुंबात देखील चांगला असावा. स्वतः आनंदी राहावे व दुसऱ्यांना देखील आनंदी ठेवावे. 5 ते 13 हे वय मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी महत्त्वाचे असते. जर या मुलांना चांगले व्यक्ती बनवू शकलो, तर ही निश्चितच चांगले होईल. हे देशाच्या भविष्यासाठी देखील चांगले असेल.

Leave a Comment