सचिन तेंडूलकर वरून ट्रम्प यांना पीटरसनने केले ट्रोल

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे भारतीय दौऱ्यावर आहेत. अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियममध्ये ट्रम्प यांनी केलेल भाषण विशेष गाजले. आपल्या भाषणात ट्रम्प यांनी बॉलिवूडपासून ते क्रिकेट अशा अनेक क्षेत्रातील दिग्गजांचा उल्लेख केला. मात्र ट्रम्प यांचे हे भाषण आणखी एका कारणांसाठी गाजले, ते म्हणजे ट्रम्प यांनी भारतीय नावे उच्चारताना केलेली चूक.

ट्रम्प यांनी आपल्या भाषणात क्रिकेट दिग्गज सचिन तेंडूलकर आणि विराट कोहली यांचा उल्लेख केला. ट्रम्प यांनी या नावांचा उच्चार करताच स्टेडियममध्ये बसलेल्या भारतीयांनी देखील जोरात प्रतिसाद दिला. मात्र मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरच्या नावाचा उच्चार चुकीचा केला. यामुळे सोशल मीडियावर ट्रम्प यांना ट्रोल केले जात असून, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केव्हिन पीटरसनने देखील ट्रम्प यांना ट्रोल केले.

पीटरसनने ट्विटमध्ये ब्रिटिश टिव्ही होस्ट पीअर्स मॉर्गन यांना टॅग करत लिहिले की, कृपया तुमच्या सहकार्याला दिग्गजांच्या नावाचा उच्चार करण्यापुर्वी रिसर्च करायाला सांगा.

एवढेच नाही तर आयसीसीने खिल्ली उडवत लिहिले की, Sooch, Sutch नावाला ओळखता का ?, असा प्रश्न नेटकऱ्यांना विचारला.

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जिमी नीशम आणि आइसलँड क्रिकेटने देखील ट्विट करत ट्रम्प यांना ट्रोल केले.

Leave a Comment