आता आला स्पर्श आणि वेदना समजणारा रोबॉट

जापानच्या वैज्ञानिकांनी अँड्राईडवर आधारित एक असा रोबॉट तयार केला आहे, ज्याला वेदना जाणवतात. वैज्ञानिकांचा दावा आहे की, लवकरच रोबॉट देखील माणसांसोबत राहू शकतील, ते दिवस आता लांब राहिलेले नाहीत.

वैज्ञानिकांनी सांगितले की, मनुष्यासारखे रोबॉट तयार करणे ही काही मोठी गोष्ट नाही. मात्र त्यांच्यात संवेदना निर्माण करणे मोठी गोष्ट आहे. ओसाका यूनिवर्सिटीने या रोबॉटचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

Image Credited – designboom

प्रोफेसर असादा यांनी या रोबॉटला एफेट्टो असे नाव दिले आहे. याचा इटॅलियन भाषेत अर्थ एफेक्शन अर्थात प्रेम (स्नेह) होतो. टीमने रोबॉटचा चेहरा बनवला आहे. हा रोबॉट कोमल स्पर्श आणि कठोर स्पर्श यातील फरक ओळखू शकतो. त्याच्या चेहऱ्यावर याचे भाव देखील पाहायला मिळतात. एफेट्टोला 2011 मध्ये लोकांसमोर सादर करण्यात आले होते. त्यानंतर 2018 पर्यंत यात अनेक बदल करण्यात आले. यात इलेक्ट्रिक चार्जद्वारे सिंथेटिक स्किन लावण्यात आली, याद्वारे वेदना जाणवतात.

Image Credited – Bhaskar

प्रोफेसर असादा यांनी सांगितले की, आम्ही रोबॉटमध्ये एक स्पर्श आणि वेदनातंत्र बसवत आहोत. जेणेकरून रोबॉटला वेदना जाणवू शकतील व तो दुसऱ्याचा स्पर्श समजू शकेल. जर हे शक्य झाले तर यामध्ये सहानभुती आणि नैतिकता आणण्याचा प्रयत्न देखील केला जाईल.

त्यांनी सांगितले की, जर यात यश मिळाले तर रोबॉट जापानच्या वृद्ध समाजाला भावनात्मक आणि शारीरिक सहाय्यता प्रदान करू शकतो.

Leave a Comment