या देशात दारू पिऊन सायकल चालवणाऱ्यांना होते जेल

जपानच्या प्रगतीमध्ये तेथील कॅमेरा आणि तंत्रज्ञानाची मोठी भूमिका आहे. मात्र येथे राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानालाच संपुर्ण श्रेय दिले जाऊ शकत नाही. जपानला सुरक्षित देश बनविण्याचे काम येथील कठोर कायदे, गुन्हे रोखणारे नियम आणि देशातील शिक्षा करते. वर्ष 2018 ला ग्लोबल पीस इंडेक्स यादीत जापान नवव्या स्थानावर होता.

Image Credited – Amarujala

जपानच्या ड्रग्स आणि गुन्ह्यांसंबंधीत संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टनुसार वर्ष 2018 ला जपानमध्ये 1 लाख लोकांच्या मागे 0.28 दराने हत्येच्या घटना घडल्या. जपानचे नागरिक शांतपणे झोपू शकतात, याच्यामागे पोलिसांचे कायदे आहेत. हे कायदे 200 वर्ष जुने आहेत. जपानमध्ये याला कोबेन म्हटले जाते. कोबेनमध्ये 2 ते 3 पोलीस कर्मचारी असतात. हे कर्मचारी नागरिकांच्या सुरक्षेची, वस्तूंची काळजी घेतात. संपुर्ण जापानमध्ये असे 6600 कोबेन आहेत.

Image Credited – Shouse Law Group

जपानमधील आणखी एक कडक कायदा म्हणजे, येथे दारू पिऊन सायकल चालवल्यास दंड आणि कारावासाची शिक्षा होते. येथे हेडफोन घालून सायकल चालवणे, फोन वापरणे अथवा सायकल चालवताना छत्री वापरण्यास देखील मनाई आहे. जापानचे नागरिक या कायद्याचे विशेष पालन करतात.

जपानमध्ये अनेक घरे व दुकानांवर ‘कोडोमो 110 बॅन इन द ले’  नावाचे स्टिकर देखील लावलेले असते. याचा अर्थ लहान मुले अडचणीत असतील तर या जागेचा शेल्टर होम म्हणून वापर करू शकतात.

Image Credited – Amarujala

जपानमधील चालक नियमांचा काटेकोरपणे पालन करतात. येथे दुर्घटनेत कठोर शिक्षा दिली जाते. दारू पिऊन गाडी चालवणाऱ्या कारावास होतो. येथे बंदूक खरेदी करण्यासाठी देखील दिर्घकाळ प्रतिक्षा करावी लागते. यासाठी तुम्हाला एक कोर्स करावा लागतो. या कोर्सच्या परिक्षा 95 टक्के उत्तर योग्य दिल्यावरच तुम्ही बंदूक खरेदी करू शकता. याशिवाय मनोवैज्ञानिक आणि डोपिंग चाचणी देखील होते.

Leave a Comment