चीननंतर आता हा देश झाला कोरोना व्हायरसचा नवीन गड

चीनच्या वुहान शहरानंतर आता इराण कोरोना व्हायरसचे नवीन केंद्र झाले आहे. कोरोना व्हायरसमुळे चीननंतर सर्वाधिक मृत्यू येथेच झाले आहेत. येथे संसंर्ग झालेल्या लोकांपैकी 25.53 टक्के लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे संपुर्ण मध्य-पुर्व भागात हा व्हायरस पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. जगभरात आतापर्यंत 80,128 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला असून, 2,700 लोकांचा मृत्यू झाला आहे. यातील 90 टक्के संख्या ही चीनमधील आहे.

चीननंतर कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू इराणमध्ये झाले आहेत. येथे आतापर्यंत 47 लोकांना संसर्ग झाला असून, त्यातील 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. इराणमधील कमकुवत सरकार आणि अक्षम आरोग्य व्यवस्थेमुळे देशात या व्हायरसमुळे अनेकांचे प्राण जाण्याची शक्यता आहे.

इराक, अफगाणिस्तान, बहरीन, कुवैत, ओमान, लेबनान, यूएई आणि कॅनडामधून देखील कोरोना व्हायरसची प्रकरण समोर आली आहेत. सर्वांचा कशाना कशाप्रकारे इराणशी संबंध आहे.

इराणमधून संपुर्ण जगात हा व्हायरस पसरण्याची दोन कारणे आहेत. यातील एक म्हणजे जगभरातील मजूर येथे काम करतात व दुसरे म्हणजे येथील धार्मिक यात्रा. इराणवर अमेरिकेसह अनेक आंतरराष्ट्रीय प्रतिबंध आहेत.

जानेवारी महिन्यात इराणच्या क्वोम शहरातून तब्बल 30 हजार लोक अफगाणिस्तानला परतले आहेत.  या शहरातच व्हायरसचा अधिक प्रभाव आहे. इराकने इराणशी जोडलेल्या सीमा बंद केल्या असून, इतर देशांवर देखील यासाठी दबाव येत आहे. इराणने क्वोम शहरातील प्रशासनांना धार्मिक यात्रांवर प्रतिंबध घालण्याचे आदेश देखील दिले आहेत.

Leave a Comment