या ठिकाणी चक्क ‘डॉल्फिन’ करतात आण्विक शस्त्रांचे रक्षण

अमेरिकेतील सीऐटलपासून जवळपास 30 किमी अंतरावार हूड कॅनल आहे. येथेच नेव्हल बेस किटसॅप आहे. ही जागा अमेरिकेच्या जवळपास एक चतृतांश आण्विक शस्त्रांचे स्टोर हाऊस आहे. ही जागा दोन कारणांसाठी खास आहे. एक तर येथे जगातील सर्वात मोठ्या आण्विक शस्त्रांचे भांडार आहे व दुसरे म्हणजे या जागेचे रक्षण कोणतीही व्यक्ती अथवा मशीन करत नाही.

या जागेच्या रक्षणाची जबाबदारी डॉल्फिन आणि सी लायनची आहे. जवळपास 85 डॉल्फिन आणि 50 सी लॉयनला कॅलिफोर्निया येथील एका केंद्रात प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

Image Credited – businessinsider

गंभीर प्रकरणात या समुद्री जीवांच्या शरीरात एक बाइट प्लेट बसवली जाते. डॉल्फिन घुसखोरी करणाऱ्यांच्या पायाचा स्पर्श करते व त्याच्या पायाला प्लेट चिकटते. जोपर्यंत याद्वारे संदेश हँडलरपर्यंत पोहचत नाही. तोपर्यंत घुसखोरी करणारा आपल्या पायातून प्लेट बाहेर काढू शकत नाही.

Image Credited – businessinsider

हे समुद्री जीव मनुष्यासोबत मिळून काम करतात. डॉल्फिन एक प्रकारच्या सेंसरचा वापर करून पाण्याच्या खालील धोक्याचा शोध घेतात व धोका असल्यास वरती येऊन आपल्या हँडलरला सुचना देतात. जर हँडलरला काही संशयास्पद आढळले, तर हँडलर डॉल्फिनच्या नाकावर नॉइजमेकर अथवा ऑर्ब लाईट ठेवतो. या डॉल्फिनला घुसखोरी करणाऱ्यांना धडक देण्यासाठी प्रशिक्षित केलेले असते.

Image Credited – OMGFacts

डॉल्फिन पाण्याची खालील तळापर्यंत अनेक गोष्टींची माहिती घेऊ शकतात. डॉल्फिनकडे समुद्रात खोलपर्यंत आवाज पकडण्याची क्षमता असते. सी लायनकडे देखील ऐकणे व पाहण्याची क्षमता असते. समुद्रात खाली खूप अंधार असला तरी देखील सी लॉयन पाहू शकतो. याच कारणामुळे आण्विक शस्त्राच्या सुरक्षेसाठी डॉल्फिन आणि सी लॉयनला निवडण्यात आलेले आहे.

Leave a Comment