वारंवार आहारात बदल केल्याने होऊ शकते नुकसान

जर तुम्ही चांगल्या फिटनेससाठी वारंवार आपल्या डाइटमध्ये बदल करत असाल, तर त्वरित सावध व्हा. कारण यामुळे कोणताही फायदा होत नसून, यामुळे नुकसानच होत आहे. वय देखील कमी होऊ शकते. असा दावा ब्रिटनच्या शेफील्ड यूनिवर्सिच्या वैज्ञानिकांनी केला आहे.

यानुसार, जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे जेवण घेत असाल व अचानक तंदुरूस्तीसाठी हेल्थी जेवण घेण्यास सुरुवात केली तर तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. यासाठी वैज्ञानिकांनी फ्रूट फ्लाइज आणि ड्रोसोफिलिया मेलानोगास्टर प्रजातीच्या माशींवर प्रयोग केले.

या माशींना आधी दररोज वेगवेगळे जेवण दिले. त्यानंतर त्यांना त्याच खाण्यावर निर्भर केले, याचा त्यांच्यावर वाईट परिणाम पाहायला मिळाला. नियमित आहार घेणाऱ्या माशींच्या तुलनेत या माशींच्या मरण्याची शक्यता वाढली. काही माशींचा मृत्यू झाला तर काहींनी कमी अंडी दिली.

या संशोधनात सहभागी असलेले वैज्ञानिक डॉ. मिरे सिमंत यांच्यानुसार, हे आपल्या अपेक्षा आणि विकासाच्या प्रचलित सिद्धांताच्या उलट आहे. विशेष अथवा एकूण पोषक तत्वाच्या सेवनाची कमतरता मनुष्य आणि प्राण्यांमध्ये जिंवत राहण्याच्या क्षमतेला जन्म देते. जेवणाची कमी उपलब्धता असताना देखील जिवित राहणे आणि शरीरात उर्जा कायम ठेवण्यास सक्षम असते. मात्र आहारात वारंवार बदल केल्याने ही क्षमता कमी करते व तुमचे आयुष्य जगण्याचे वय देखील कमी करते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment