या 62 वर्षांच्या पठ्ठ्याने तब्बल 8 तास ‘प्लँक’करून बनविला विश्वविक्रम

अमेरिकेच्या शिकागो येथील नेपरव्हिले येथे राहणाऱ्या 62 वर्षीय माजी यूएस मरीन जॉर्ज हुड यांनी सलग 8 तासांपेक्षा अधिक वेळ प्लँकिंग करत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे. हा विक्रम करण्यासाठी जॉर्ज मागील 18 महिन्यांपासून दररोज 7 तास सराव करत होते.

15 फेब्रुवारीला जॉर्ज यांनी 8 तास, 15 मिनिटे आणि 15 सेकेंद एब्डोमिनल प्लँक करत हा विक्रम केला.

जॉर्ज हुड यांनी 2011 मध्ये सर्वात प्रथम 1 तास 20 मिनिटे प्लँक करण्याचा विक्रम केला होता. मात्र 2016 मध्ये चीनच्या माओ वेंदोंगने त्यांचा हा विक्रम मोडला होता. तेव्हापासून ते नवीन विक्रम करण्यासाठी सराव करत आहेत.

Image Credited – WTHR

जॉर्ज हुड आधी अमेरिकेच्या ड्रग एफोर्समेंट एडमिनिस्ट्रेशनमध्ये सुपरवाइजरी एजेंट होते. आता त्यांचे लक्ष्य सर्वाधिक पुशअप मारण्याचे आहे. सध्या एका तासात 2806 पुश-अप मारण्याचा जागतिक विक्रम आहे.

Image Credited – Bhaskar

आपल्या ट्रेनिंगबद्दल जॉर्ज यांनी सांगितले की, मी दररोज सरासरी 700 पुशअप, 2,000 सीटअप्स आणि 50 स्क्वॉट्स मारायचो. हात आणि बॉडीसाठी दररोज 300 बेंड कर्ल्स केले. दीड वर्षात एकूण 6,74,000 सीटअप्स आणि 2,70,000 पुशअप्स केले.

Leave a Comment