मोदींची रेंजरोव्हर ट्रम्प यांच्या बीस्टपेक्षा अधिक वेगवान


फोटो सौजन्य जनम टीव्ही
जगाची महासत्ता अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प भारत भेटीवर आहेत आणि येथे त्यांच्या जगातील सर्वात शक्तिशाली कारची म्हणजे कॅडीलॅक वन बीस्टची चर्चा जोरात सुरु आहे. अहमदाबाद येथे ट्रम्प यांचे परिवारासह आगमन झाल्यावर पंतप्रधान मोदी यांनी त्यांचे स्वागत केले आणि ट्रम्पना त्याच्या बीस्टपर्यंत पोहोचवून मोदी त्यांच्या अधिकृत रेंज रोव्हरमध्ये बसून रवाना झाले तेव्हापासून या दोन गाड्यांची तुलना होऊ लागली आहे.

ट्रम्प यांची बीस्ट जगातील सर्वात सुरक्षित आणि बुलेट बॉम्बप्रूफ आहेच पण त्यात हॉस्पिटलची सुद्धा सुविधा आहे. या कार मध्ये ब्लडबँक आहे. भले ही जगातील सर्वात सुरक्षित कार असेलही पण मोदींची रेंज रोव्हर तिला एका बाबतीत मात देते. मोदी यांनी काही काळापूर्वी बीएमडब्ल्यू बदलून रेंज रोव्हर एचएसई वापरण्यास सुरवात केली आहे. ही कार ३६० डिग्री सुरक्षा देते. तिला ५.० लिटरचे व्ही ८ पेट्रोल इंजिन असून १८ स्पीड ऑटो गिअरबॉक्स आहे. तिचा सर्वाधिक वेग ताशी २१८ किमी आहे आणि येथेच ती ट्रम्प यांच्या बीस्टला मात देते.

ट्रम्प यांच्या बीस्टचा जगातील सर्वात सुरक्षित वाहन असा बोलबाला असला तरी तिचे वजन ९८ टन आहे त्यामुळे तिच्या वेगाला मर्यादा येते. ट्रम्प यांची बीस्ट जास्तीतजास्त ताशी ९० किमी वेगानेच धावू शकते.

Leave a Comment