३० कोटींच्या अलिशान घरात राहतो सिक्सरकिंग रोहित शर्मा


फोटो सौजन्य नई दुनिया
आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये तीन डबल सेन्चुरी मारणारा टीम इंडियाचा एकमात्र फलंदाज रोहित शर्मा याचे बालपण जरी गरिबीत गेले असले तरी त्याच्यासाठी परिस्थिती आता पूर्ण बदलली आहे. आयपीएलच्या यशस्वी कप्तान यादीत सामील असलेला भारताचा हा सिक्सर किंग आता महानगरी मुंबईत ३० कोटींच्या अलिशान फ्लॅट मध्ये वास्तव्यास आहे. वरळीच्या अहुजा अपार्टमेंटस या ५३ मजली इमारतीत २९ मजल्यावर रोहितचा हा अतिप्रशस्त फ्लॅट आहे.

हा फ्लॅट चार बेडरूम्सचा असून त्याचा एरिया ६ हजार चौरस फुट आहे. येथून बांद्रा वरळी सीलिंकचा सुंदर व्हू दिसतो तसेच मुंबापुरीचे दर्शन होते. २०१५ मध्ये रितिका सजदेह हिच्याबरोबर साखरपुडा केला तेव्हाच त्याने हा फ्लॅट बुक केला होता आणि डिसेंबर मध्ये विवाह झाल्यावर तो येथे राहायला आला होता. रोहितची बेडरूम ६०० चौ. फुट असून घरात एक एंटरटेनमेंट एरिया आहे. तेथे मुव्हीज अथवा लाईव्ह सामने मोठ्या स्क्रीनवर बघण्याची सोय आहे.

रोहितने वनडे मध्ये असे रेकॉर्ड नोंदविले आहे जे सहजी मोडण्याची शक्यता कमी आहे. त्याने २०१९ मध्ये इंग्लंड वनडे वर्ल्ड कप मध्ये पाच शतके ठोकली आहेत. वर्ल्ड कप मधले चार शतकांचे कुमार संगकाराचे रेकॉर्ड त्याने मोडले आहे.

Leave a Comment