हुवावेचा दुसरा फोल्डेबल मेट एक्सएस सादर


फोटो सौजन्य कॉम्प्युटर बिल्ट
चीनी कंपनी हुवावेने गतवर्षी मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेसमध्ये त्यांचा पहिला फोल्डेबल स्मार्टफोन मेट एक्स सादर केल्यानंतर आता या सिरीजचा विस्तार करताना दुसरा फोल्डेबल स्मार्टफोन मेट एक्सएस नावाने सादर केला आहे. किरिन ९९० फाईव्ह जी चिपसेट सह हा फोन लाँच केला असून त्याचा ग्लोबल सेल पुढील महिन्यापासून सुरु होत आहे.

या फोनची किंमत २४९९ पौंड म्हणजे १.८० लाख रुपये आहे. हा फोन दोन लेअर स्ट्रक्चर फोल्डेबल ओलेड पॅनल सह आहे. त्याचा डिस्प्ले ८.० इंची असून फोल्ड केल्यावर तो ६.६ इंची होतो. त्याला ४८ एमपीचा मुख्य कॅमेरा शिवाय ८ एमपिचे फोटो लेन्स तसेच १६ एमपीचा वाईड अँगल कॅमेरा दिला गेला आहे मात्र त्याला फ्रंट कॅमेरा नाही.

याचे विशेष म्हणजे फोन फोल्ड केला की रिअर कॅमेरा फ्रंट कॅमेराप्रमाणे वापरता येतो. अँड्राईड १० ओएस असलेल्या या फोनला ८ जीबी रॅम आहे. फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एएमएच बॅटरी आहे.

Leave a Comment