केवळ राजकारणात नाही तर अभिनयातही मास्टर आहेत ट्रम्प


फोटो सौजन्य कॅच न्यूज
अमेरिकेचे अध्यक्ष डोनल्ड ट्रम्प हुशार उद्योजक, धूर्त राजकारणी आहेतच पण अभिनयातही ते मास्टर आहेत याची कल्पना अनेकांना नसेल. ट्रम्प यांनी अनेक हॉलीवूड चित्रपट आणि टीव्ही शो मध्ये अभिनय केला आहे. भारतातही गाजलेल्या होम अलोन टू चित्रपटात त्यांनी कॅमीओ रोल केला आहे. म्हणजे स्वतःचीच भूमिका साकारली आहे. ज्या हॉटेल सूट मध्ये ते दिसतात ते हॉटेल त्यांच्याच मालकिचे आहे. अर्थात ट्रम्प गेली अनेक वर्षे वेळोवेळी अभिनय करत आहेत. १९९४ मध्ये त्यांनी ‘द लिटील रास्कल’ चित्रपटात स्पेशल अॅपिअरन्स दिला होता.

१९९६ मध्ये दि असोसिएशन चित्रपटात त्यांनी हुपी गोल्डबर्गसह काम केले होते तर त्याच वर्षी अमेरिकन सीटकॉम टीव्ही सिरीज ‘स्पिन सिटी’ मध्ये काम केले होते. सेक्स अँड गे सिटी या न्युयॉर्क शहरावर आधारित लिहिल्या गेलेल्या कादंबरीवर आधारित शो मध्ये आणि त्याच्या दुसऱ्या सिझन मध्येही ट्रम्प झळकले होते. त्यात ते महिलांना प्रभावित करताना दिसले होते. १९९७ मध्ये ‘सडनली मुसेन पीव्ही शो मध्ये डोनल्ड बिझिनेसमनच्या भूमिकेत होते आणि ती भूमिका अनेकांना आवडली होती. २००२ मध्येही ‘ टू वीक नोटीस’ चित्रपटात ते उद्योगपती बनले होते.

पत्नी मेलेनिया बरोबर ट्रम्प यांनी पाच वर्षे डेटिंग केले होते आणि तिला दीड डॉलरची अंगठी देऊन प्रपोज केले होते असेही सांगतात. २०१५ मध्ये त्यांचा विवाह झाला असून मेलेनिया ट्रम्प यांची तिसरी पत्नी आहे.

Leave a Comment