एका ट्विटद्वारे विराट करतो एवढ्या कोटींची कमाई

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली ट्विटवर सर्वाधिक कमाई करणारा भारतीय खेळाडू ठरला आहे. विराट आपल्या एका ट्विटद्वारे तब्बल 2.51 कोटी रुपयांची कमाई करतो. तर पोर्तुगलचा फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो ट्विटरवरून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत जगात पहिल्या स्थानावर आहे. रोनाल्डो एका ट्विटद्वारे तब्बल 6.2 कोटी रुपयांची कमाई करतो.

अमेरिकेतील स्पोर्ट्स अँड स्पोर्ट्स कल्चर वेबसाईट ब्लेचर रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली असून, ट्विटरवरून सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट पाचव्या स्थानावर आहे.

ब्लेचरनुसार, विराट कोहली भारतीय क्रिकेट संघासाठी एक रनमशीन म्हणून पुढे आला आहे. तसेच त्याने अनेक विक्रम देखील तोडले आहेत. त्यामुळे देशासह जगभरात त्याची लोकप्रियता वाढली आहे. अनेक ब्रँड्सच्या माध्यमातून कोहली कोट्यावधींची कमाई करतो.

ट्विटरद्वारे सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत पहिल्या स्थानावर फुटबॉलपटू रोनाल्डो (6.24 कोटी रुपये ) आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर फुटबॉलपटू अँड्रेस इनिएस्ता (4.25 कोटी रुपये), तिसऱ्यावर फुटबॉलपटू नेमार ( 3.44 कोटी रुपये) आणि चौथ्या स्थानावर अमेरिकन फुटबॉलपटू लेब्रॉन जेम्स (3.38 कोटी रुपये) आहे. या यादीत विराट 2.51 कोटी रुपयांसह पाचव्या स्थानावर आहे.

Leave a Comment