ट्रम्प भारतात झाले शाकाहारी, खाणार समोसा, ढोकळा आणि चहा

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे पत्नी मेलानिया, मुलगी इवांका, जावई जेरेड कुशनेर आणि इतर आधिकाऱ्यांवर दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आहेत. ट्रम्प 36 तास भारतात राहणार असून, या दौऱ्या दरम्यान ते काय खाणार, त्यांचा मेन्यू काय असेल ? याबाबत विशेष चर्चा सुरू आहे.

ट्रम्प यांना टोमॅटो सॉससोबत बीफ खाणे आवडते. मात्र भारत दौऱ्यात त्यांच्या मेन्यूमधून बीफ गायब असेल. ट्रम्प यांच्या मेन्यूमध्ये केवळ शाकाहारी गोष्टींचा समावेश असेल. हे पदार्थ गुजराती स्टाइलमध्ये तयार केले जातील.

फॉर्च्युन लँडमार्क हॉटेलचे शेफ सुरेश खन्ना यांना ट्रम्प यांचे कुटुंब आणि पंतप्रधान मोदींसाठी जेवण तयार करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे.

शेफ सुरेश खन्ना यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्यासाठी फॉर्च्युनर सिग्नेचर कुकीज, खमण ढोकळा आणि ब्रोकली कॉर्न समोसे असा मेन्यू आहे. ट्रम्प यांना खमण ढोकळा विशेष आवडतो. सुरेश खन्ना मोदींसाठी त्यांच्या आवडीचा आले व मसाला चहा देखील तयार करतील. आइस टी आणि ग्रीन टी ला देखील मेन्यूमध्ये स्थान देण्यात आलेले आहे.

खन्ना यांनी सांगितले की, ते मागील 17 वर्षांपासून गुजरात दौऱ्यावर येणाऱ्या पाहुण्यांसाठी जेवण तयार करत आहेत.
खन्ना यांच्यानुसार, तयार करण्यात आलेल्या जेवणाला आधी फूड इंस्टेपक्टर टेस्ट करतील. त्यानंतरच जेवण पाहुण्यांना दिले जाईल.

Leave a Comment