अभिनेत्री ते मुख्यमंत्री : जाणून घ्या जयललितांचा प्रवास

‘अम्मा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जयललिता यांच्या सारखी लोकप्रियता भारतात खूप कमी मुख्यमंत्र्यांना मिळाली. आज जयललिता यांचा जन्मदिवस.

24 फेब्रुवारी 1948 ला म्हैसूर येथे जन्म झालेल्या जयललितांचा मुख्यमंत्री पदापर्यंतच्या प्रवासात अनेक उतार-चढाव आले. तामिळनाडूच्या द्रविड प्रधान राजकारणात कर्नाटकच्या आयंगर ब्राह्मण जयललिता यांनी मुख्यमंत्री बनण्याचा रेकॉर्ड केला. जयललिता सहा वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री झाल्या.

Image Credited – The Quint

जयललिता अभ्यासात देखील नेहमीच अव्वल होत्या. त्यांची आई संध्याच्या सांगण्यावरून त्यांनी जबरदस्ती अभियनाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले. जयललिता यांची आई स्वतः तामिळ चित्रपटात चांगली अभिनेत्री होती.

जयललिता यांनी वयाच्या 15 व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. तमिळ, तेलगू आणि कन्नडमध्ये त्यांनी 140 पेक्षा अधिक चित्रपटात काम केले. त्या तमिळ चित्रपटसृष्टीत एक पॉवरफूल अभिनेत्री म्हणून पुढे आल्या. तामिळ चित्रपट ‘पट्टीकडा पट्टनामा’ यांसाठी त्यांना 1973 मध्ये राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला.

Image Credited – The Quint

जयललिता अण्णाद्रमूकचे संस्थापक एमजीआर यांच्या खूप जवळच्या होत्या. एमजीआर तमिळ सिनेमामध्ये सुपरस्टार होते. दोघांनी सोबत 28 चित्रपटांमध्ये काम केले. मात्र नंतर त्याल एमजीआर यांच्यासोबत राजकारणात आल्या. एम करुणानिधी यांचा पक्ष द्रमुखपासून वेगळे होऊन एमजीआर यांनी अण्णाद्रमुखची स्थापना केली. वर्ष 1983 मध्ये जयललितांना राज्यसभेवर देखील पाठवण्यात आले.

Image Credited – The Quint

1987 मध्ये एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता यांनी पक्षाचे प्रमुखपद सांभाळले. 1989 मध्ये तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्ष नेत्या होणाऱ्या त्या पहिल्या महिला नेत्या होत्या. मात्र 1996 मध्ये त्यांचा पराभव झाला.

Image Credited – The Quint

2014 मध्ये बेहिशेबी संपत्ती प्रकरणात त्यांना न्यायालयाने 4 वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावली. भ्रष्टाचाराचे आरोपानंतर देखील त्यांनी 1991, 2002 आणि 2004 मध्ये विधानसभा निवडणूक जिंकली. अटक झाल्यानंतरही देखील 2016 मध्ये देखील त्यांनी विधानसभेत विजय मिळवला होता.

Image Credited – The Quint

5 डिसेंबर 2016 ला अखेर दिर्घआजारामुळे चेन्नईच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये जयललिता यांचे निधन झाले.

Leave a Comment