नोकरीची सुवर्णसंधी, इंडियन ऑइलमध्ये शेकडो जागांसाठी भरती

सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी इंडियन ऑइलमध्ये काम चांगली संधी आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये 500 जागांसाठी भरती करण्यात येत आहे.

इंडियन ऑइलने वेस्टर्न रिजनसाठी ऑप्रेंटिससाठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पदांसाठी अर्ज मागितले आहेत. या पदांसाठी 18 ते 24 वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात.

वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची पात्रता वेगळी आहे. पदानुसार उमेदवार 12वी, डिप्लोमा आणि पदवी परिक्षा 50 गुणांसह पास झालेला असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित ट्रेंडमध्ये 50 गुणांसह आयआयटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 मार्च असून, इच्छुक व पात्र उमेदवार इंडियन ऑइलची अधिकृत वेबसाईट iocl.com वर जाऊन अर्ज करू शकतात.

अर्ज केलेल्या उमेदवारांना आधी 100 गुणांची लेखी परिक्षा द्यावी लागेल. या परिक्षेत पास झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल व त्यानंतर मेडिकल चाचणी होईल.

Leave a Comment