70 रुपयांपेक्षा स्वस्तात जिओचे नवीन प्लॅन्स

रिलायन्स जिओने आपल्या जिओ फोन युजर्ससाठी खास स्वस्तातले दोन कमी वैधता असणारे प्लॅन्स आणले आहेत. या प्लॅन्समध्ये युजर्सला जिओ अ‍ॅपचे स्बस्क्रिप्शन देखील मिळेल.

49 रुपये –

49 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14 दिवसांची वैधता मिळेल. या प्लॅनमध्ये जिओ नेटवर्कवर अनलिमिडेट कॉलिंग्स व दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 250 मिनिट्स मिळतील. 25 फ्री एसएमएस सोबत यामध्ये 4 जीबी डेटा मिळेल.

69 रुपये –

हा प्लॅन देखील 14 दिवसांच्या वैधतेसोबत येतो. मात्र यात तुम्हाला 7 जीबी डाटा मिळेल. बाकी सेवा 49 रुपयांच्या प्लॅनप्रमाणेच मिळेल. यात जिओ नेटवर्कवर अनलिमिडेट कॉलिंग्स व दुसऱ्या नेटवर्कवर कॉलिंगसाठी 250 मिनिट्स आणि 25 फ्री एसएमएस मिळतील.

यासोबतच जिओ फोन युजर्ससाठी स्वस्तातले ऑल इन वन प्लॅन देखील आहेत. युजर्ससाठी 75 रुपये, 125 रुपये, 155 रुपये, 183 रुपये आणि 185 रुपयांचे देखील स्वस्तातले प्लॅन्स उपलब्ध आहेत. या सर्व प्लॅनची वैधता 28 दिवसांची असून, यातील काही प्लॅनमध्ये दिवसाला 1 ते 1.5 जीबी डाटा आणि जिओ नेटवर्कवर अनलिमिडेट वॉईस कॉलिंग देखील मिळेल.

Leave a Comment