शाओमीला टक्कर देणार रिअलमीचा स्मार्ट टिव्ही

चीनची स्मार्टफोन कंपनी रिअलमी आपला पहिली वहिला स्मार्ट टिव्ही या महिन्यात वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये सादर करणार होती. मात्र कोरोना व्हायरसमुळे हा इव्हेंट रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या टिव्हीच्या लाँचिंगला उशीर होणार आहे. मात्र आता रिअलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी सांगितले की, भारतात हा स्मार्ट टिव्ही 2020 च्या दुसऱ्या तिमाहीत लाँच केला जाणार आहे.

रिअलमीचा हा टिव्ही अँड्राईडवर चालणारा असेल. या टिव्हीमध्ये नेटफ्लिक्स आणि इतर लोकप्रिय कंटेट प्लॅटफॉर्म सपोर्ट मिळेल की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

रिअलमी आपला फिटनेस बँड देखील लाँच करणार आहे. या बँडमध्ये हार्ट रेट मॉनिटर, ओलेड स्क्रीन आणि बिल्ट इन यूएसबी कनेक्टर मिळेल. रिअलमी फिटनेस बँडमध्ये देखील शाओमीला टक्कर देणार आहे. सध्या देशात फिटनेस बँड सेगमेंटमध्ये शाओमीचा दबदबा आहे. त्यामुळे फिटनेस बँड आणि स्मार्ट टेलिव्हज सेगमेंटमध्ये रिअलमीच्या एंट्रीमुळे शाओमीला मोठी टक्कर मिळणार आहे.

Leave a Comment