नवीन लूकसह मारुती सुझुकीची ‘व्हिटारा ब्रेझा’

मारुती सुझुकीने आपली बहुप्रतिक्षित एसयूव्ही व्हिटारा ब्रेझा फेसलिफ्टला लाँच केले आहे. या नवीन व्हिटारा ब्रेझाची किंमत 7.34 लाख ते 11.40 लाख रुपये आहे. या नवीन एसयूव्हीमध्ये बीएस6 मानक इंजिन देण्यात आलेले आहे.

नवीन मारुती ब्रेझामध्ये 1.5 लीटर के15बी पेट्रोल इंजिन देण्यात आलेले आहे. जे 103 बीएचपी पॉवर आणि 138 एनएम टॉर्क निर्माण करते. यासूत 5 स्पीड मॅन्युअल आणि 4 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय मिळेल. ऑटोमॅटिक गिअरबॉक्स व्हेरिएंटमध्ये मारुतीची स्मार्ट हायब्रिड टेक्नोलॉजी देखील मिळेल.

Image Credited – NDTV

मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये ही एसयूव्ही 17.03 किमी मायलेज देईल. तर स्मार्ट हायब्रिड टेक्नोलॉजीसोबत येणाऱ्या ऑटोमॅटिक ट्रांसमिशन व्हेरिएंटमध्ये 18.76 किमी मायलेज मिळेल.

नवीन व्हिटारा ब्रेझामध्ये नवीन ट्विन स्लेट ग्रिल, रिवाइज्ड बंपर, बुल-बार स्टाइल स्किड प्लेट, नवीन डिझाईनचे एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, एल-आकाराचे डीआरएल, 16 इंच ड्युअल टोन एलॉय व्हिल्ज आणि नवीन फॉग लॅम्प हाउसिंग मिळेल.

Image Credited – Carwale

कॅबिनबद्दल सांगायचे तर यात ब्रेझा फेसलिफ्ट मॉडेल रिवाइज्ड अपहोस्ट्री, लेदर फिनिश स्टेअरिंग व्हिल आणि नवीन 7 इंच स्मार्टप्ले स्टुडिओ इंफोटेनमेंट सिस्टम देण्यात आले आहे. या इंफोटेनमेंट सिस्टममध्ये आता लाईव्ह ट्रॅफिक अपडेट, वॉइस रिकॉग्निशन, व्हिकल अलर्ट आणि क्यूरेटेड ऑनलाईन कंटेटची सुविधा देखील मिळेल.सोबतच अँड्राईड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्ले देखील मिळेल.

Leave a Comment